घरलाईफस्टाईलप्रदूषित हवेचा महिलांच्या हार्मोन्सवर होतोय परिणाम

प्रदूषित हवेचा महिलांच्या हार्मोन्सवर होतोय परिणाम

Subscribe

वायू प्रदूषणामुळे महिलांच्या मासिक पाळीच्या समस्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने ही माहिती दिली आहे.

वायू प्रदूषणाची समस्या आता केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांपुरती सीमित राहिलेली नाही. मध्यम, लहान शहरे तसेच ग्रामीण भागातही विविध प्रकारचे प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले आहेत. वायू प्रदूषण हे मुख्य म्हणजे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कामामुळे वाढते. दुचाकी आणि चारचाकी वाहने कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईडची उच्च पातळी निर्माण करतात. हवेतील हे विषारी घटक शरीरात गेल्यावर त्याचा विपरीत परिणाम हार्मोन्सवर होत असल्याने तरुण महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने दिली आहे.

काय म्हणाल्या डॉक्टर

याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. सहाना हेगडे यांनी सांगितलं की,”नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायू प्रदूषणाचा शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होत असतोच. याचसोबत आपल्या शरीरातील हार्मोन्सवर दुष्परिणाम होत असतो आणि यामुळे किशोर वयातील मुलींना अनियमित मासिक पाळी तसेच विवाहित महिलांना प्रजनन संबंधित समस्या ,पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि सिंड्रोम, प्रारंभिक रजोनिवृत्तीत वाढ होताना दिसत आहे. हवेतील सूक्ष्म तरंगते कण (पीएम २.५), नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन हे वायू प्रदूषणातील तीन सर्वसाधारण घटक मर्यादेबाहेर शरीरात गेल्यास तीन ते सात दिवसांच्या कालावधीत महिलांमधील गर्भपाताच्या धोक्याची शक्यता वाढते. मासिक पाळी हे हार्मोन्सशी संबंधित असून वायू प्रदूषणामुळे हवेत असलेल्या धुळीच्या कणांमुळे हॉर्मोन्सच्या बदलांवर वाईट परिणाम होतो. हार्मोन्सवर वायू प्रदूषणाच्या होणाऱ्या प्रभावामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. अनियमित मासिक पाळी ही महिलांना एक सामान्य गोष्ट वाटत असली तरी यामुळे गर्भाशयासंबंधित आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -