घरमहा @२८८अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६५

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६५

Subscribe

अंधेरी पश्चिम (विधानसभा क्र. १६५) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

अंधेरी या संमिश्र लोकसंख्या असलेल्या उपनगराचा अंधेरी पश्चिम हा एक मतदारसंघ आहे. मात्र, या भागतल्या सेवा कंपन्या आणि मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय राहणीमानामुळे नागरी समस्यांचा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो. तसेच, अंधेरी एमआयडीसी आणि त्यातून होणारं प्रदूषण हा मुद्दा देखील इथे चर्चेचा असतो. काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ २०१४मध्ये भाजपच्या ताब्यात आला आणि अमित साटम इथले आमदार झाले. या मतदारसंघात एकूण ३०९ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६५,२३७
महिला – १,४४,५३५

- Advertisement -

एकूण मतदार – ३,०९,७७२


amit satam
अमित साटम

विद्यमान आमदार – अमित साटम, भाजप

मुंबई भाजपमधलं एक तरूण नेतृत्व असलेले अमित साटम २००० सालापासून भाजपसाठी कार्यरत आहेत. भाजयुमोचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. मुंबई भाजयुमोचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर २०१२मध्ये मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून गेले. २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक जाधव यांचा तब्बल २५ हजारांहून जास्त मताधिक्याने पराभव केला आणि त्यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमित साटम, भाजप – ५९,०२२
२) अशोक जाधव, काँग्रेस – ३४,९८२
३) जयवंत परब, शिवसेना – २६,७२१
४) रईस लष्करीया, मनसे – १२,९७०
५) एम. ए. हुसेन, एमआयएम – ३८२१

नोटा – १४६७

मतदानाची टक्केवारी – ४६.३९ %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -