घरमहाराष्ट्र10th,12th Result 2022 : यंदा दहावी, बारावीचा निकाल 'या' दिवशी लागणार; राज्य...

10th,12th Result 2022 : यंदा दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; राज्य शिक्षण मंत्र्याची घोषणा

Subscribe

महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत टॉपला

राज्यात लवकरचं दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra state Board SSC Exam Result 2022) यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेल्या राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावीचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत. (10th, 12th Board exam results) दरम्यान दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाबाबत आज शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. यंदा दहावी, बारावीच्या बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर होऊ शकतात असं ते म्हणाले आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान निकाल उशीरा लागल्यामुळे लागल्यामुळे त्यानंतरही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी जाहीर केले.

यंदा दहावी, बारावीचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला आहे. त्यामुळे आता निकाल कधी लागणार? असा प्रश्न राज्य शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आला. यावर बच्चू कडू म्हणाले की, दहावी, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसांत जाहीर होऊ शकतो. जर दहावीच्या निकालास उशीर झाल्यास अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु. मात्र निकाल लवकरचं जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र निश्चित सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

निकालास उशीर झाल्यास प्रवेश प्रक्रिया आणि इतर गोष्टी व्यवस्थित पूर्ण करु, कोरोना काळात यात अनेक गोष्टींमध्ये उणीवा राहिला. पण तरी देखील देशाच्या एकंदरीत गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे. ही महत्त्वाची बाब आहे. दरम्यान कोरोना काळात शिक्षकांनी दुर्गम भागात अनेक प्रयोगातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत टॉपला

महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दिल्याचे राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. दरम्यान शिक्षण क्षेत्रातील रखडेल्या भरती प्रक्रिया लवकरचं घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -