घरमहाराष्ट्र३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात

Subscribe

आज सकाळी पाच वाजेपासून ३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. माजी आमदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय मॅरेथॉनचे हे १०० वे वर्ष असून त्यानिमित्ताने ३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी पाच वाजेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. माजी आमदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कै. बाबुराव सणस मैदानापासून ही स्पर्धा सुरु झाली आहे. स्पर्धेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी शनिवारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे विश्‍वस्त अ‍ॅड. अभय छाजेड, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, रोहन मोरे आणि गुरुबन्स कौर यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

नवीन तयार करण्यात आलेला मार्ग सरळ आणि धावण्यास सुरळीत

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ४२ किलोमीटर पुरुष, २१ किलोमीटर पुरुष आणि महिला, १० किलोमीटर पुुरुष आणि महिला, पाच किलोमीटर मुले आणि मुली आणि चॅरिटी रन साडेतीन किलोमीटरची आहे. नवीन तयार करण्यात आलेला मार्ग सरळ आणि धावण्यास सुरळीत असल्याने यावर्षी या शर्यती वेगवान होण्याची शक्यता आहे. गुरुबन्स कौर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक काम करत आहेत. स्पर्धा संचालक हे स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत धावपटूंना मार्ग दाखविण्यासाठी सज्ज आहेत. धावपटूंना मार्ग दाखविणारे विविध बोर्ड, खेळाडूंची नोंदणी, स्वयंसेवक तसेच तांत्रिक अधिकार्‍यांची नियुक्‍ती आणि प्रशिक्षण पुर्ण करण्यात आले आहे. डेक्‍कन जिमखाना येथे सन १९१९ साली प्रथम राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा भरविण्यात आली होती. या घटनेला १०० वर्ष पुर्ण होत असून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ३४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

- Advertisement -

असा आहे मॅरेथॉनचा मार्ग

४२ किलोमीटरची स्पर्धा ही सणस मैदानापासून सुरु होऊन स. प. महाविद्यालयाच्या पाठीमागून दांडेकर पुल मार्गे सिंहगड रोडने वडगाव पुल मार्गे नांदेड सिटीपासून पुन्हा फिरणार आहे. हा मार्ग २१ किलोमीटरचा असला तरी त्यासाठी दोन फेर्‍या ४२ किलोमीटरच्या स्पर्धकाला पुर्ण कराव्या लागणार आहेत. २१ किलोमीटरसाठी हाच मार्ग असून एक फेरी पुर्ण करावयाची आहे. १० किलोमीटरच्या गटामध्ये स्पर्धक सणस मैदानापासून सुरु होऊन सिंहगड रोडवरील माणिकबाग येथून पुन्हा फिरणार आहे. पाच किलोमीटरची स्पर्धा सणस मैदानापासून सुरु होऊन पु. ल. देशपांडे उद्यानापासून पुन्हा फिरणार आहे. याचबरोबर साडेतीन किलोमीटरचा चॅरिटी रन सुध्दा आयोजित करण्यात आलेली आहे.

परदेशी धावपटूंचा सहभाग अल्प

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ३४ व्या वर्षात पदार्पण करीत असताना परदेशी धावपटूंचा सहभाग अल्प असल्याचे आढळून आले आहे. दरवर्षी १०० ते १२० पदेशी धावपटू सहभागी होत असतात. यावर्षी ही १२० परदेशी धावपटूंचा सहभाग अपेक्षित असताना काही परदेशी धावपटूंना व्हिसा न मिळाल्याने हे धावपटू सहभागी होणार नसल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -