घरठाणेThane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू

Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (5 patients died in Thane municipal hospital in a single day) रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये एका गरोदर महिलेचा देखील समावेश आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

हेही वाचा – Navjot Singh Sidhu : ‘जखमा बऱ्या झाल्या पण…’; कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीसाठी सिद्धूंनी लिहिली भावनिक पोस्ट

- Advertisement -

कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारच मिळत नसल्याची तक्रार अनेक रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचे असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे 100 रु., आयसीयू बेडचे 200 रु., तर ऑक्सिजन बेडचे 200 रु. मागितले जात असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

कळव्यातील या रुग्णालयामध्ये एकाच दिवसामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून गोंधळ घालण्यात आला. यानंतर घाबरलेल्या रुग्णालय प्रशासनाकडून देखील याबाबतचा खुलासा करण्यात आलेला आहे. कळवा रुग्णालयाची रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता ही आता संपलेली आहे. त्यामुळे ICU विभाग देखील फुल झालेला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ज्या पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यातील तीन रुग्ण हे गंभीर अवस्थेत होते, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने करत पाच रुग्णांचा मृत्यू कसा झाला याबाबतची माहिती दिली आहे. कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले की, यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर एका रुग्णाचा उलटी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण अज्ञात होता आणि एका रुग्णाच्या पायाला गळू झाला तर एक गरोदर माता होती मृत पावली आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराची माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशीलं लाल केली असती, असे म्हणत सुमारे पाच तास मृतदेह आयसीयूमध्ये ठेवणार्‍या डॉक्टरांना आव्हाडांनी चांगलेच फैलावर घेतले. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहराला स्मार्ट सिटी करत असताना, शहर भर कोट्यावधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे याच ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र दिसून येत आहे. मल्टीस्पेशालिटी, टाटा कर्करोग रुग्णालयाची उभारणी करत असल्याच्या सांगण्यात येत आहे. असे असले तरी, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची उभारणी करणे गरजेचे असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सांगण्यात आले.

याबाबतचे ट्वीट देखील जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी संताप व्यक्त करत लिहिले आहे की, “गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली.

त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता.तेथे पोहचलो असता,संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले.तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते.थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती.उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते.याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता,त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली. मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे.

या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे.बिल वाढवून लावली जात आहेत,डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत…इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे.यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच..पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -