घरताज्या घडामोडीCoronavirus: गेल्या २४ तासांत ७५ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण!

Coronavirus: गेल्या २४ तासांत ७५ पोलिसांना कोरोना विषाणूची लागण!

Subscribe

कोरोनामुळे आतापर्यंत २० पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७५ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९६४वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत २० पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८४९ पोलिस कोरोनामुक्त झाले आहे. पण पोलिसांना कोरोना विषाणूची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह पोलिसांची संख्या १ हजार ९५ आहे. एकूण बाधित पोलिसांच्या संख्यांपैकी २२३ पोलिस अधिकारी असून १ हजार ७४१ पोलिस कर्मचारी आहेत. देशात महाराष्ट्र सर्वाधित कोरोनाबाधित राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजारांच्या वर आहे. तर मृतांची संख्या १ हजारांहून अधिक आहे.

राज्यात अनेक उपाययोजना करून कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात ५४ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्यापैकी १ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा संख्या १ लाख ५२ हजारांहून अधिक झाली आहे. जगात कोरोनाच्या यादीत भारत हा दहाव्या क्रमांक आहे. भारताने इराक मागे टाकले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Locusts Attack: पाकिस्तानातून आलेल्या टोळ कीटकांची देशात दहशत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -