घरमहाराष्ट्रमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भिषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Subscribe

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मध्यरात्रीच्या सुमारास ईरटिका कारचा (एम एच 11 सीएच 159) अडोशी गावा जवळ भिषण अपघात झाला आहे. पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाला झोपेची डूलकी लागल्याने कार एक्सप्रेस वे वर सुरक्षेकरीता लावण्यात आलेल्या लोंखडीं रेलींग मध्ये घुसली. कारची धड़क एवढी जोरदार होती की चालकाला शेजारी बसलेल्या प्रवासी मोतीराम मोतीवाले यांच्या शरीरातून लोखंडी रेलींग आरपार गेले, आणि त्यांच्या मागे बसलेल्या मोहिनी मोतीवाले यांच्याही शरीराला गंभीर दुखापत करत रेलींग तिसऱ्या सिट वर शेवटी बसलेल्या उषा मोतीवाले यांच्या अंगातून पार होत बाहेर निघाली.

- Advertisement -

अपघातादरम्यान मयत मोतीराम तसेच जखमी मोहीनी यांच्या मांडीवर दोन लहान मुले बसली होती अपघातात त्यांना ही गंभीर दुखापत झाली आहे. एकुण दोन लहान मुले तसेच एका महीलेला अशा तीघा जखमीनां उपचारा करता पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातातून कार चालक किरन गुरसुंड हा आश्चर्यकारक रित्या बचावला. पुण्याहून धार्मिक विधी आटपून मुंबई अंधेरीकडे येण्यासाठी ओला कारची बुकींग करुन मोतीवाले कुटूंबीय निघाले होते. पंरतू ३८ किलोमीटर अडोशी गावाजवळ त्यांच्या कारचा दुर्देवी अपघात झाला.

देवदुत यंत्रणा, महामार्ग पोलीस ,अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेच्या सदस्यांनी मोलाची मदत करत अपघातग्रस्त वाहन महामार्गावरुन बाजुला करत जरवमीनां तात्काळ् रुग्नालयात हलवले तर इतर दोन मृत्यांना खोपोली येथील शासकिय रुग्नालयात पाठाविण्यात आले आहेत. महामार्गावर अपघातांच्या संखेंत वाढ झाली आसून खोपोली हद्दीत २४ तासात दोन वेगवेगळ्या अपघातात ५ जणाना मृत्यु तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -