घरमहाराष्ट्रनागपूरBJP : काँग्रेसचे "हैं तैयार हम" अभियान नेमकं कशासाठी? भाजपाने विचारले पाच...

BJP : काँग्रेसचे “हैं तैयार हम” अभियान नेमकं कशासाठी? भाजपाने विचारले पाच प्रश्न

Subscribe

नागपूर : काँग्रेस पक्षाच्या 139 व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरच्या पवित्र भूमितून परिवर्तानाचा संदेश दिला जाणार आहे. मात्र आता काँग्रेसच्या ‘है तयार हम’ अभियानावर सडकून टीका करताना भाजपाकडून पाच प्रश्न विचारण्यात आले आहेत. (Congress hai taiyaar hum campaign for what exactly BJP asked five questions)

हेही वाचा – Priyanka Gandhi: मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रियंका गांधींचे नाव; ईडीने आरोपपत्रात केले ‘हे’ आरोप

- Advertisement -

महाराष्ट्र भाजपाकडून ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यावर म्हटले आहे की, पुन्हा हारण्यासाठी तुमचं स्वागत आहे, मोहब्बत करप्शनचे  दुकान उघडण्यासाठी तुमचे स्वागत आहे, स्वागत आहे तुमचे काँग्रेस वर्धापनदिन नागपूरमध्ये, असे म्हणत काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?, असा सवाल करत आणखी 5 प्रश्न भाजपाने काँग्रेसला विचारले आहेत.

- Advertisement -

भाजपाने ट्वीट करताना म्हटले की, काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी?
1) हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला साथ देण्यासाठी काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान आहे का?
2) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करण्यासाठी काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान आहे का?
3) काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेली साडे तीनशे कोटींची रोकड अवैध मार्गाने कशी मिळवावी हे सांगण्यासाठी काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान आहे का?
4) मोहब्बत की दुकानच्या नावाने द्वेष पसरविण्यासाठी काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान आहे का?
5) घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचे ‘है तयार हम’ अभियान आहे का?

हेही वाचा – प्रचारासाठी Ajit Pawar देणार प्रत्येक जिल्हाध्यक्षाला नवी कोरी आलिशान SUV Car; 40 गाड्यांचं बुकिंग

काँग्रेसने ट्वीटमध्ये काय म्हटले?

दरम्यान, काँग्रेसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात काँग्रेसचे कार्य आणि काँग्रेसचा विचार यावर भाष्य करण्यात आले आहे. “आम्ही संघर्ष, त्याग, तपश्चर्या आणि त्याग आहोत. या देशावर प्रेम करणाऱ्या करोडो भारतीयांचा आम्ही स्वाभिमान आहोत. आम्ही काँग्रेस आहोत”, असं ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलं होतं, यावर आता भाजपाकडून सडकून टीका करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी करणार सूचना

पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुका इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्याचवेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी काँग्रेसने 28 डिसेंबर या स्थापनादिनाचे औचित्य साधत नागपूरमध्ये सभा आयोजित केली आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात भाजपाला लक्ष्य करताना मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -