घरमहाराष्ट्रVideo : बुलडाण्यात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

Video : बुलडाण्यात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण

Subscribe

बुलडाण्यामध्ये प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नांदुरा बस स्थानकावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीच्या कुटुंबियांनी ही मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न झाल्यामुळे कोणतिही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती बुलडाणा पोलिसांनी दिली आहे.

बस स्थानकावर गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलांना बेदम मारहाण

बस स्थानकावर गप्पा मारत बसलेल्या प्रेमी युगुलांना बेदम मारहाण

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 16, 2019

- Advertisement -

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अप-डाऊन करतात असतात. यामधील एक विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी आपल्या प्रियकरासोबत नांदुरा बस स्थानकावर गप्पा मारत बसली होती. याबाबतची माहिती तिच्या कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी येत दोघांना रंगेहात पकडले. मुलीसोबत तिच्या प्रियकराला देखील तिच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आहे.

नादुरा बस स्थानकावर उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलीच्या कुटुंबियांनी तिचे केस ओढत तिला मारहाण केली तर तिच्या प्रियकराला लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, बस स्थानकावरील असलेला कचऱ्याच्या डब्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिला गाडीवरुन घरी घेऊन गेले. या घटने प्रकरणी अद्याप तक्रार दाखल न झाल्यामुळे कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. सध्या बुलडाणा शहरात या घटनेची चर्चा सुरु आहे. दरम्यान, प्रेमी युगुलांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याची माहिती बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -