घरक्राइमविवाहित शिक्षक प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने विवाहित शिक्षिकेची प्रियकरच्या घरी जाऊन आत्महत्या

विवाहित शिक्षक प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने विवाहित शिक्षिकेची प्रियकरच्या घरी जाऊन आत्महत्या

Subscribe

जामखेड : कोपरगाव येथे कार्यरत विवाहित शिक्षिकेचे जामखेडमध्ये राहणार्‍या एका विवाहित शिक्षकावर प्रेम जडले होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचाही फैसला झाला. मात्र, अचानक प्रियकर शिक्षकाने लग्नास नकार दिल्याने शिक्षिकेने जामखेड गाठले. जामखेडला येताच तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिन्याभरात प्रकृती खालावत गेल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियकर शिक्षक आणि त्याच्या पत्नीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतुकाबाई वाघुजी भिसे (वय 34) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. परमेश्वर धर्माजी बोडखे आणि त्याची मालुबाई परमेश्वर बोडखे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिसे या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत कार्यरत होत्या. 12 वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. चार वर्षांपासून त्यांचे पतीशी पटत नसल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. दरम्यान, त्यांची जामखेड शहरात राहणार्‍या परमेश्वर बोडखे या शिक्षिकेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातून दोघांच्या भेटी गाठी वाढल्या. दोघांनी लग्नाचा फैसला केला.

- Advertisement -

दोघे चार महिन्यांपासून कोपरगावात एकत्र राहू लागले. मात्र, शिक्षक परमेश्वर बोडखेच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड झाला. परमेश्वर बोडखे आणि त्याच्या शिक्षक असलेल्या पत्नीत वाद झाला. मग बोडखे प्रेयसीला सोडून पुन्हा पत्नीकडे जामखेडला राहायला आला. दरम्यान, 9 जुलै 2022 रोजी प्रेयसी शिक्षिकेने प्रियकर शिक्षकाची भेट घेण्यासाठी जामखेड गाठले. शिक्षिकेने प्रियकराच्या घरी जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तिला जामखेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती प्रेयसीच्या आईला शिक्षकाने कळवली.
घटनेची माहिती मिळताच मयत शिक्षिकेची आई तातडीने जामखेडला दाखल झाली. त्यानंतर मयत शिक्षकेला पुढील उपचारासाठी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर मयत शिक्षिकेला घरी सोडण्यात आले होते. मात्र महिनाभरानंतर त्या शिक्षिकेला पुन्हा त्रास होऊ लागला होता. नांदेडमधील रूग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा 9 सप्टेंबर 2022 रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मयत शिक्षिका संतुकाबाई वाघोजी भिसे हिच्या आईने 18 ऑक्टोबर रोजी जामखेड पोलीस स्टेशनला आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परमेश्वर धर्माजी बोडखे आणि मालुबाई परमेश्वर बोडखे या पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी शिक्षक परमेश्वर धर्माजी बोडखे आणि मालुबाई परमेश्वर बोडखे यांचे कुटुंब नांदेडच्या हातगाव तालुक्यातील सावरगाव येथील आहे. बोडखे हे जामखेड शेजारील पाटोदा येथे नोकरीला होते. तर जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात ते राहत होते. दरम्यान मयत शिक्षिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शिक्षक परमेश्वर धर्माजी बोडखे आणि त्याची मालुबाई परमेश्वर बोडखे या दोघांनी माझ्या मुलीच्या लग्नास विरोध केला. मुलीकडून उसने घेतलेले पाच लाख रूपये देण्यास नकार दिला. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -