घरक्राइमसंतापजनक! ऐन दिवाळीत गायीसह ३ वासरांची हत्या

संतापजनक! ऐन दिवाळीत गायीसह ३ वासरांची हत्या

Subscribe

भगूर : शहरात सर्वत्र दिवाळी उत्साही वातावरणात साजरी केली जात असताना जवळील दारणा नदी पुलालगत राहुरी शिवारात शनिवारी (दि.२३) रात्री अनोळखी व्यक्तींनी एक गाभण गाई, तीन वासरे(गोरे) यांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. विशेष म्हणजे, जनावरांचे तुकडे करून ते शेतात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे भगवे विजयनगर देवळाली राहुरी आधी परिसरात नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्ता रोको केला. त्यामुळे दोन तास भगूर-पांढुर्ली वाहतूक ठप्प झाली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ शेटे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर तानाजी भोर, संपत घुगे यांनी नागरिकांची समजूत काढली पण पोलिसांनी संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व नेते मंडळीसह नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी दोन तास भगूर-पांढुर्ली रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर पोलीस विभागाने याची तातडीने दखल घेत सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्यासह देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, राहुल बलकवडे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमलेल्या नागरिकांना जनावरांची कत्तल करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

- Advertisement -

या घटनेचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, वृक्षमित्र तानाजी भोर, ह. भ. प. शिवा महाराज आडके, बुधाजी पानसरे, प्रेस कामगार नेते रामा सांगळे, राहुरीच्या सरपंच संगीता घुगे पोलीस पाटील स्वाती पानसरे, भगूर शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे, शिवसेना माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे उपशहर प्रमुख नितीन करंजकर भाजप मंडल अध्यक्ष प्रसाद आडके,संपत घुगे, अनिल बोडके,प्रविण सांगळे, अनिल सांगळे, सागर जाधव, मदन घुगे भाऊसाहेब आव्हाड, नितीन करंजकर,दत्ता गायकवाड, शेखर जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी निदर्शने करत निषेध केला. आंदोलकांनी जनावरांची कत्तल करणार्‍यांची तातडीने चौकशी करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली.

गाय आमची माऊली आहे. समाजकंटकांनी गोमातेची हत्या करून तिचे तुकडे करून शेतात फेकून दिले हे कृत्य घृणास्पद आहे. समाजकंटकांनी हिंदूबांधवांच्या भावना दुखावल्या आहे. पोलीस यंत्रणेने सदर बाबीची गंभीर दखल घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी अन्यथा या परिसरातील नागरिक पेटवून उठतील. पुढील काळात असे प्रकार घडले तर जनआंदोलन उभारण्यात येईल. : विजय करंजकर,शिवसेना, जिल्हाप्रमुख, नाशिक

हिंदू धर्मात गो मातेचे पूजन केले जाते. गोमातेची निर्घृणपणे हत्या करून शेतात फेकून दिलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. हे कृत्य करताना त्या नराधमाचे हात का तुटले नाहीत. त्यांना परमेश्वर माफ करणार नाही. आरोपींना शोधून तात्काळ शिक्षा करावी. : एकनाथ शेटे, प्रांताध्यक्ष, विश्व हिंदू परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -