घरमहाराष्ट्रएचआयव्ही सहजीवन जगणार्‍यानी दिवंगतांना वाहिली श्रद्धांजली

एचआयव्ही सहजीवन जगणार्‍यानी दिवंगतांना वाहिली श्रद्धांजली

Subscribe

 एचआयव्ही सहजीवन जगणार्‍यांनी त्यांचे अधिकार व हक्कांना उजाळा मिळावा, या उदेशाने एकत्र येऊन एचआयव्हीने मृत पावलेले बालक व नागरिकांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समानतेची वागणूक मिळावी, तसेच कायद्याचे संरक्षण, व्यक्तीचा धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या विविध कारणास्तव कोणीही त्या व्यक्तीशी भेदभाव करू नये असे संविधानात नमूद केलेले आहे. याचप्रमाणे समाजातील सर्वसाधारण नागरिकांप्रमाणेच एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍यांनादेखील सन्मानाने, प्रतिष्ठेने जगण्याचा व समानतेची वागणूक मिळण्याचा तेवढाच अधिकार आहे. मानवधिकार दिनाचे औचित्य साधून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाऊंडेशन यांच्या वतीने एच.आय.व्ही.

- Advertisement -

सहजीवन जगणार्‍यांनी त्यांचे अधिकार व हक्कांना उजाळा मिळावा या उदेशाने एकत्र आले. यावेळी एचआयव्ही सहजीवन जगण्यातील अडचणींवर मात कशी करावी, यावर मंथन झाले. तसेच दिवंगत झालेल्या बालक व नागरिकांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महिंद्रा कंपनीचे सनी लोपेझ, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, यश फाऊंडेशनचे कार्यक्रम अधिकारी वैभव पवार, धीरज पाटील, प्राची खरे, काजोल थोरात, संगीता मुरादे आणि एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍या महिला उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -