घरमहाराष्ट्रपुणे: रिक्षाच्या धडकेनंतर बसखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

पुणे: रिक्षाच्या धडकेनंतर बसखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

Subscribe

रविवारी रात्री सुरू झालेलं अपघातांच सत्र सोमवारी सकाळी देखील सुरू होतं. पुण्यात टिळक रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला रिक्षेने धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार फरफटत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि समोरून येणाऱ्या बसच्या मध्यभागी अडकला. त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२ वाजता घडली.

आकाश तुकाराम विधाते अस या तरूणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश हा त्याच्या स्पोटस बाईकवरून वेगात टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी या संस्थेजवळील कशाळे कॉर्नर येथून स्वारगेटच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याला रिक्षेची धडक बसली. त्यामुळे आकाश दुचाकीसह फरफटत रस्त्याच्या पलिकडे चौकाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पीएमपी बसच्या पुढील चाकात अडकला. त्यात गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

पुण्यात दुचाकीस्वाराची अपघात, रिक्षेच्या धडकेनंतर बसखाली येऊन मृत्यू!

पुण्यात दुचाकीस्वाराची अपघात, रिक्षेच्या धडकेनंतर बसखाली येऊन मृत्यू!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 2, 2020

स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आकाश हा दुग्ध व्यवसायिक होता. अपघातावेळी आकशने हेल्मेट देखील घातले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -