घरमहाराष्ट्रचुकीच्या पार्किंगसाठी झाड लावायची शिक्षा!

चुकीच्या पार्किंगसाठी झाड लावायची शिक्षा!

Subscribe

पुणे तिथं काय उणे अस वेगवेगळ्या गोष्टींसाठी पुण्याची ओळख आहे. तसाच काहीसा मात्र तितकाच कौतुकास्पद उपक्रम सध्या पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. काळेवाडी येथील संस्कृती सोसायटीमध्ये नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांवर शिस्तभंगाची कारवाई करत चक्क जॅमर लावला जातो. शिक्षा म्हणून त्या व्यक्ती कडून पैसे न घेता सोसायटीच्या परिसरात झाड लावायला सांगितलं जातं. त्यामुळे चुकून गाडी नो पार्किंगमध्ये पार्क केल्यास वृक्ष संवर्धन होत आहे. हा उपक्रम गेल्या चार महिन्यापासून संस्कृती सोसायटीमध्ये सुरू आहे. त्यामुळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गाडी लावली तर झाडं लावा

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. याचा नाहक त्रास नागरिक सहन करत असून रस्ते अरुंद झाल्याने नागरिक वाहने रस्त्यावर पार्क करतात. पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करत जॅमर लावतात ते काढण्यासाठी नियमाप्रमाणे पैसे दंड भरावा लागतो. हे तितकच खरं आहे पण, शहरातील काळेवाडी भागात चक्क सोसायटीमध्ये नो पार्किंगमध्ये चारचाकी किंवा दुचाकी वाहन लावल्यास कारवाईला समोर जावं लागत असून इथे वाहतूक पोलीस नाही तर सुरक्षा रक्षकच वाहनांवर शिस्तभंगाची कारवाई करत जॅमर लावतात. असा सोसायटीच्या कमिटीत एकमताने निर्णय घेतलेला आहे अशी माहिती चेरमन आशिष माने यांनी दिली. त्याची कटाक्षाने गेल्या चार महिन्यापासून अंमलबजावणी केली जात आहे.

- Advertisement -

सीसीटीव्हीद्वारे ठेवली जाते नजर

सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक नियमांचे पालन न करणारे नागरिक येथील संस्कृती सोसायटीमध्ये मात्र नियमांचे पालन करताना दिसत आहेत. सोसायटी मधील वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाते जर शिस्तभंग केलाच तर पर्यावरण पूरक अशी शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाते. स्वत:ला आवडेल त्या झाडाचं रोपटं आणून सोसायटीच्या परिसरात लावायचं आणि ते जोपासायचं ही त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. त्यामुळे अनेक जण जाणीवपूर्वक ही शिक्षा मिळावी म्हणून नियम डावलतात. त्यामुळे एक झाड लावण्याची संधी येथील सोसायटी धारक व्यक्तीला मिळत आहे. या नियमावलीमुळे आपण नो पार्किंगमध्ये तर गाडी पार्क करत नाहीत ना या धास्तीत सोसायटी धारक असतात. येथील वाहतूक नियमांचा फायदा खऱ्या अर्थाने सार्वजनिक रस्त्यावर चांगलाच होत असल्याचे नागरिक सांगतात. अनेक वेळा आपण गाडी सार्वजनिक रस्त्यावर पार्क करून निघून जातो. आता मात्र, नो पार्किंगचा फलक बघूनच गाडी लावली जाते असं नागरिक सांगतात.

हेही वाचा – 

- Advertisement -

ठाणेकरांना पार्किंगसाठी दोन वाहनतळांची निर्मिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -