घरमहाराष्ट्रकौतुकास्पद! गतिमंद मुलाची 'कळसुबाई'वर यशस्वी चढाई

कौतुकास्पद! गतिमंद मुलाची ‘कळसुबाई’वर यशस्वी चढाई

Subscribe

कणाद या १२ वर्षीय गतिमंद मुलीने कळसुबाई शिखरावर जाऊन आपला वाढदिवस साजरा केला. ल्या वर्षी त्याने ७ दिवसात ११ किल्ले सर केल्याचा विक्रमाची 'इंडिया बुक ऑफ रेकोर्ड'ने नोंद घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील कणाद पिंपळनेरकर या १२ वर्षीय गतिमंद मुलाने, ‘कळसूबाई’ या  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई केली. त्याने कळसुबाईवर जाऊन आपला १२ वा वाढदिवस साजरा केला आहे. कणाद लहानपणापासूनच ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी कणादचं उदाहरण उत्साहवर्धक व प्रेरणादायक ठरेल असंच आहे. कणाद हा पिंपळनेरकर कुटुंबाचा एकुलता एक मुलगा आहे. डॉक्टरांनी कणाद कधीही चालू शकणार नाही,असे त्याच्या आई वडिलांना सांगितले होते. त्याउलट कणादने आय्यप्पाच्या छोट्या टेकडीपासून पावलं टाकत प्रयत्नांची पराकाष्ठा करत, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण करुन चांगला संदेश दिला आहे. पुणे येथील बालकल्याण संस्थेत कणाद सध्या  वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे. कणादला गिर्यारोहणाची आवड आहे.  गेल्या वर्षी त्याने ७ दिवसात ११ किल्ले सर केल्याचा विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्ड’ने नोंद घेतली आहे. यावर्षी नारायणगड, हडसर, चावंड हे तीन किल्ले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ ही सलग चढाईची मोहिम आपल्या आई-वडिलांसोबत कणादने फत्ते केली.
२५ डिसेंबर रोजी वाढदिवसी सकाळी ९ वाजता कळसूबाई शिखराची चढाई सुरु केली. शिखरावर जाणार्‍या वाटेतल्या चार लोखंडी शिड्या हे कणादसाठी एक मोठेच आव्हान होते. मात्र न डगमगता, भीतीवर मात करत, दुपारी २ वाजता कळसूबाई शिखरमाथा गाठला. वर पोचताच कणादने भगवा झेंडा आणि राष्ट्रध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त केला. कळसूबाईचे दर्शन व आशिर्वाद घेऊन पायथ्याला संध्याकाळी ७ वाजता सुखरुप पोचून कणादने मोहिम पूर्ण केली.
या मोहिमेतील नारायणगड, हडसर आणि चावंड हे तिन्ही किल्ले गिर्यारोहणाच्या वाटांसाठी वेगवेगळी आहेत. त्यामुळे या तिन्ही किल्ले चढाईचा एकत्रित अनुभव लगेचच कळसूबाई शिखर चढण्यास कामी आला. आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर म्हणाले,की ‘निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरी भागात वेगवेगळ्या वाटांवर भटकंती करताना कणादच्या नैसर्गिक क्षमताही वाढू लागल्या आहेत. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने दिलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -