घरदेश-विदेश'द अॅक्सिडेंटल सीएम'ची भाजपकडून खिल्ली!

‘द अॅक्सिडेंटल सीएम’ची भाजपकडून खिल्ली!

Subscribe

'द अॅक्सिडेंटल पीएम'प्रमाणे 'द अॅक्सिडेंटल सीएम' असा चित्रपट बनविण्यात आला तर कुमारस्वामींची भूमिका कोण करणार, असा प्रश्न कर्नाटक भाजपने विचारला आहे. कमी जागा मिळूनही मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे भाजपने कुमारस्वामी यांची खिल्ली उडवली आहे.

‘द अॅक्सिडेंटल पीएम’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या ट्रेलरचा व्हिडिओ भाजपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. याच चित्रपटाची दोरी पकडत भाजपने आणखी एक ट्वीट केले आहे. यामध्ये भाजपने कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. द अॅक्सिडेंटल पीएमप्रमाणेच द अॅक्सिडेंटल सीएम असा चित्रपट बनविण्यात आला तर कुमारस्वामींची भूमिका कोण करणार, असा प्रश्न कर्नाटक भाजपने विचारला आहे.

कुमारस्वामी यांची उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२२ जागांपैकी सर्वाधिक असे १०४ जागांवरती विजय मिळाला. तर काँग्रसला ८० जागांवर विजय मिळाला होता. त्याचबरोबर कर्नाटकाचा स्थानिक पक्ष जेडीएसने ३७ जागांवर विजय मिळाला होता. भाजपने सर्वाधिक असे १०४ जागांवर विजय मिळवूनही भाजपचा उमेदवार मुख्यमंत्री होऊ शकला नाही. यामागे काँग्रेसने तसे शक्कल लढवले होते. भाजपचा मुख्यमंत्री होता कामा नये आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवता यावे यासाठी काँग्रेसने जेडीएस पक्षालोबत तडजोड करुन हातमिळावणी केली. त्यामुळे कुमास्वामी यांच्या पदरी मुख्यमंत्री पद आले. जास्त जागा मिळाल्या असूनही सत्तेपासून वंचित राहिल्यामुळे कर्नाटकच्या भाजपने कुमारस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. ‘द अॅक्सिडेंटल पीएम’प्रमाणे ‘द अॅक्सिडेंटल सीएम’ असा चित्रपट बनविण्यात आला तर कुमारस्वामींची भूमिका कोण करणार, असा प्रश्न कर्नाटक भाजपने विचारला आहे. कमी जागा मिळूनही मुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे भाजपने कुमारस्वामी यांची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -