घरमहाराष्ट्रठाण्यात लॉकडाऊनमध्ये ३ हजार वाहनांवर कारवाई, १३ लाखाचा दंड वसूल

ठाण्यात लॉकडाऊनमध्ये ३ हजार वाहनांवर कारवाई, १३ लाखाचा दंड वसूल

Subscribe

लॉकडाऊन काळात विनाकारण गाड्या घेऊन फिरणाऱ्यांना चाप बसण्यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. ठाण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ३ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ३१६ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांकडून १३ लाख ९ हजार दंड वसुल करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यात २ जुलै पासून दहा दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान ठाणे पोलीस तसेच वाहतूक विभागाने ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच गस्त वाढवली आहे.

लॉकडाऊनमध्ये विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून गुरुवारी ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात पोलिसांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत ११८१ वाहनांवर कारवाई केली असून भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर या ठिकाणी १५६३ वाहने असे एकूण २७४४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३१६ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचाकांकडून पोलिसांनी १३ लाख ९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या पुढे ९ दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – आता ट्रान्सजेंडर निमलष्करी दलात बनणार अधिकारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -