घरमहाराष्ट्रभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आणखी एकाला अटक

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आणखी एकाला अटक

Subscribe

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नुकतेच दलित विचारवंत आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाला एक वर्ष उलटून गेली आहेत. मात्र या प्रकरणासंबंधीची अटकसत्र अजूनही सुरुच आहेत. या प्रकरणी नुकतेच दलित विचारवंत आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवार, २ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यानंतर त्यांची पुण्यात रवानगी करण्यात आली. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील माओवाद्यांशी त्यांचे कथित संपर्क होते, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तेलतुंबडे गोवा इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकवतात. त्यांनी यापूर्वी पुण्यातील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जदेखील केला होता. परंतू, तो नकारण्यात आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दंगली भडकवण्याचे लावले आरोप 

पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन नकारला होता. तसेच तेलतुंबडेंचे एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचे मुबलक पुरावे आहेत, असेही सांगितले होते. याच माओवाद्यांमुळे आणि एल्गार परिषदेने भीमा कोरेगावची दंगल भडकावली होती, असा आरोप आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदाने यांनी हे निरीक्षण नोंदवले होते. दरम्यान, आनंद तेलतुंबडे यांनी सांगितल्याप्रमाणे, सुप्रीम कोर्टाने त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे आपली अटक बेकायदा असल्याचे सांगितले आहे. तेलतुंबडे यांचे वकील रोहन नाहर यांनी सुप्रीम कोर्टाच्या ११ जानेवारीच्या निकालाचा दाखला दिला असून त्यामध्ये हीच गोष्ट कोर्टाकडून सांगण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा 

भीम आर्मीच्या ‘रावण’ भीमा कोरेगावत

कोरेगाव भीमा परिसरावर ड्रोनची नजर

- Advertisement -

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; ५ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -