घरमनोरंजनजितेंद्र यांच्या नावावरुन एकताने ठेवले मुलाचे नाव!

जितेंद्र यांच्या नावावरुन एकताने ठेवले मुलाचे नाव!

Subscribe

एकता कपूरने तिच्या मुलाचं नाव ठेवण्यामागची खास स्टोरीही एकताने सर्वांना सांगितली आहे.

छोट्या पडद्यावरील आघाडाची निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर नुकतीच आई बनली आहे. सरोगसीच्या माध्यमातून एकताने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. भाऊ तुषार कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत एकताही सरोगसीच्या माध्यमातून ‘सिंगल मदर’ बनली आहे. दरम्यान, एकता कपूर आई बनल्याची बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्री तसंच बॉलीवूडमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यासोबतच एकता तिच्या बाळाचं नाव काय ठेवणार? असा प्रश्नही सोशल मीडियावरुन विचारला गेला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकता आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार, याविषयी बरेच अंदाज बांधले. काहींनी तर चक्क तिला नावंदेखील सुचवली. मात्र, एकता तिच्या मुलाचं नाव काय ठेवणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

मात्र, अखेर एकताने आपल्या मुलांचं नाव जाहीर केलं आहे. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत एकताने तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. एकताने तिच्या मुलाचं नाव ‘रवी कपूर’ ठेवलं असून, हे नाव ठेवण्यामागची खास स्टोरीही एकताने सर्वांना सांगितली आहे. एकता कपूरचे वडील जितेंद्र कपूर यांच्या मूळ नावावरुन ‘रवी’ नाव ठेवण्यात आल्याचं समजतंय.

- Advertisement -

एकताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आई होणं हा जगातला सुंदर अनुभव आहे. माझ्या आयुष्यात हे वळणं येणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि लाईफ चेंजिंग असं असणार आहे. माझ्या बाळाच्या येण्याने माझ्या तसंच माझ्या घरच्यांच्या आनंदात किती भर पडली आहे याचं वर्णन मी शब्दांत करु शकत नाही. अवर्णनीय असा हा आनंद आहे.’

- Advertisement -

‘डेलिसोप क्नीन’ अशी ओळख असलेल्या एकताने टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं असं साम्राज्य निर्माण केलं आहे. एकताने आजवर लग्न केलेलं नाही. मात्र, आई बनण्याची इच्छा असल्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून तिने आई बनण्याचा निर्णय घेतला. एकता कपूरच्या भावासोबत तिची बेस्ट फ्रेंड असलेली अभिनेत्री साक्षी तन्वर हिनेही सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -