घरमहाराष्ट्रमुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला अदानीची 'पॉवर', दोन मेट्रोलाइनला करणार वीजपुरवठा

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला अदानीची ‘पॉवर’, दोन मेट्रोलाइनला करणार वीजपुरवठा

Subscribe

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडसोबत (AEML) दोन मेट्रोलाइनसाठी – मेट्रो 2A (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) भागीदारी करार केला आहे. याद्वारे दरवर्षी 12 कोटी युनिटपेक्षा अधिक वीज वापरली जाणार आहे.

देशातील इतर शहरांप्रमाणे मुंबईतील वीजवितरणाची रचना ही जटिल प्रकारची आहे. महाराष्ट्रात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट (BEST) आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण (MSEDCL) या दोन प्रमुख सार्वजनिक कंपन्यांसह – टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यासारखे अनेक वीजवितरक आहेत.

- Advertisement -

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही कंपनी मुंबई उपनगरातील 31 लाखांहून अधिक घरांना तसेच व्यावसायिकांना वीज पुरवते. विस्तृत अशा वीजवितरण जाळ्यामुळे 99.995 टक्के विश्वासार्हतेसह अदानी इलेक्ट्रिसिटी ही ग्राहकांसाठी एक पसंतीची वीजपुरवठादार कंपनी बनली आहे. कंपनीकडून स्पर्धकांच्या तुलनेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांनादेखील सेवा देते.

“गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालय, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या (AEML) प्रवक्त्याने सांगितले. “आम्हाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबईच्या मेट्रो प्रवाशांना सेवा देताना आनंद होत आहे आणि वातावरणातील कार्बनचे अस्तित्व कमी करण्यातील साहाय्यासाठी आमचे शाश्वत उपाय हे नेहमीच भिन्न राहिले आहेत, असेही या प्रवक्त्याने सांगितले.

- Advertisement -

गेल्या दोन ग्रीड आउटेज दरम्यान अदानी इलेक्ट्रिसिटीच्या विस्तृत अस्तित्वावरील विश्वासार्हतेचे खूप कौतुक झाले. व्यवसायाच्या पुनर्बांधणी दरम्यान काही महत्त्वाचे व्यवसाय विलग करण्यात आले. तर काही स्वतंत्र ठेवण्यात आले. पर्यावरणपूरक विजेचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न कायम राखताना अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी वर्ष 2027पर्यंत 60 टक्क्यांपर्यंत हिस्सा विस्तारण्याच्या वचनबद्धतेसह अक्षय ऊर्जा स्रोताचा अधिकाधिक उपयोग करून मुंबईतील 30 टक्के विजेची मागणी पूर्ण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात आशर यांचा मोठा आर्थिक हातभार, ठाकरे गटाचे शरसंधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -