घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : आमचा बेळगाव दौरा निश्चित पण..., मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : आमचा बेळगाव दौरा निश्चित पण…, मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्टीकरण

Subscribe

आमचा बेळगाव दौरा अद्याप निश्चित असून, आम्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात जाणार असल्याची माहिती मंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई मंगळवारी कर्नाटकात जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु, आमचा बेळगाव दौरा अद्याप निश्चित असून, आम्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात जाणार असल्याची माहिती मंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. (Maharashtra Government Minister Shambhuraj Desai Talk On Belgaum Tour and Maharashtra Karnataka Border)

मंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना बेळगाव दौऱ्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, “महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावमध्ये मराठी बांधवाानी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला 3 तारखेच्या ऐवजी 6 तारखेला आम्ही दोन्ही मंत्र्यांनी हजेरी लावावी, अशी विनंती त्या मराठी बांधवांनी केली होती. त्यानुसार आम्ही आमचा 6 तारखेचा दौरा निश्चित केलेला आहे. या दौऱ्याबाबत अधिृतपणे आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. मात्र दौऱ्याची पूर्णपणे माहिती त्यांना दिलेली नाही. अद्याप आम्ही हा दौरा रद्द केल्याचे त्यांना कळवलेले नाही. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ”

- Advertisement -

“कर्नाटक राज्यातील लोकांनी सामंजस्याने भूमिका घेणे गरजेचे आहे. आम्ही सामंजस्याने भूमिका घेण्यासाठी तयार आहोत. बेळगावात म्हणजेच सीमा भागात मराठी भाषिक नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या राज्यातील दोन मंत्र्यांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार आम्हाला येऊ द्या. आम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू आणि त्यानंतर तेथील मराठी भाषिक नागरिकांशी संवाद साधू आणि परत येऊ. त्यामुळे आता सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय कर्नाटकच्या सरकारने घ्यायचा आहे”, असेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.

याशिवाय, “आम्ही घाबरलेलो नाही. आम्हाला सांमजस्यातून या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादातून तोडगा काढायचा आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. हे प्रकरण चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने यामध्ये मद्यस्थी करावी आणि समन्वयातून या दोन राज्यांमधील प्रश्न सोडवावा ही आमची भूमिका आहे. आतातायी पणा करून आणि कायदा हातात घेऊन आम्हाला हा वाद चिघळवायचा नाही. मराठी भाषिकांना न्याय मिळावा ही आमची भूमीका आहे”, अशा शब्दांत देसाईंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून महाराष्ट्रातले नेते उद्या कर्नाटकात जाणार नाहीत, फडणवीसांनी केलं स्पष्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -