घरमहाराष्ट्रडॉमिनोजने घेतला मनसेचा धसका; लवकरच सुरु करणार मराठी App

डॉमिनोजने घेतला मनसेचा धसका; लवकरच सुरु करणार मराठी App

Subscribe

डॉमिनोजचं महाराष्ट्र नवनिर्माण सेने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांना पत्र

फ्लिपकार्ट, Amazon नंतर आता डॉमिनोजने मनसेचा धसका घेतला असून लवकरच मराठी App सुरु करणार आहेत. यासंदर्भातलं पत्र डॉमिनोजने महाराष्ट्र नवनिर्माण सेने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांना पाठवलं आहे. डॉमिनोजने मनसेला पाठवलेल्या पत्रात आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. आम्ही लवकरच मराठी App सुरु करणार आहोत. त्यावर काम सुरु आहे, असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्ट आणि Amazon ने मराठी भाषेत App सुरु करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी ‘माय महानगर’ ला दिलेल्या मुलाखतीत डॉमिनोज मराठीत App सुरु करणार असल्याचं पहिल्यांदा जाहीररित्या सांगितलं होतं. इतर राज्यांमध्ये त्या राज्याच्या भाषेत App असतात, मग महाराष्ट्रात राहून व्यवसाय करता तर मराठीमध्येपण App सुरु करायला हवं, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं सचिन गोळे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं.

- Advertisement -

मनसेने फ्लिपकार्ट आणि Amazon नंतर डॉमिनोजकडे मोर्चा वळवला. सचिन गोळे यांनी स्वत: डॉमिनोजच्या व्यवस्थापकांना भेट देत मराठीत App सुरु करण्यास सांगितलं. यानंतर डॉमिनोजच्या व्यवस्थापकांनी कोणताही वाद न करता सचिन गोळे यांना एक पत्र द्यायला सांगितलं. त्यानंतर मनसेने पत्र दिल्यानंतर डॉमिनोजचे कायदेशीर व्यवस्थापक संदीप मेहरा यांनी मनसेला पत्र पाठवत आम्ही लवकरच मराठीमध्ये App सुरु करतो असं सांगितलं आहे.

- Advertisement -

डॉमिनोजने घेतला मनसेचा धसका; लवकरच सुरु करणार मराठी अॅप

फ्लिपकार्ट, Amazon नंतर आता डॉमिनोजने मनसेचा धसका घेतला असून लवकरच मराठी App सुरु करणार आहेत. यासंदर्भातलं पत्र डॉमिनोजने महाराष्ट्र नवनिर्माण सेने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांना पाठवलं आहे. डॉमिनोजने मनसेला पाठवलेल्या पत्रात आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. आम्ही लवकरच मराठी App सुरु करणार आहोत. त्यावर काम सुरु आहे, असं म्हटलं आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, 31 December 2020

काही दिवसांपूर्वी मनसेने Amazon मराठीमध्ये सुरु करण्यासाठी आंदोलन केलं होतं. Amazon चे बॅनर मनसैनिकांनी फाडले होते. यामुळे Amazon ने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, सचिन गोळे आणि अखिल चित्रे यांना नोटीस पाठवली. राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्याने मनसैनिकांनी Amazon चे कार्यालय फोडलं. मनसेच्या खळखट्याकनंतर Amazon ने माघार घेत मराठी App सुरु करणार असल्याचं जाहीर केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -