घरदेश-विदेशईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार, आमदार संजय राऊतांच्या घरी; रोहित पवारांनीही घेतली भेट

ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार, आमदार संजय राऊतांच्या घरी; रोहित पवारांनीही घेतली भेट

Subscribe

अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीच. मात्र, त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या कारवाईचा निषेध केला. दरम्यान, ईडीने एकीकडे कारवाई केली असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेचा खासदार, आमदारांनी भेट दिली. संजय राऊत यांनी मंगळवारी सर्व खासदारांना, आमदारांना चहापानाला बोलावलं होतं.

सध्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार दिल्लीत आहेत. या सर्व आमदारांना संजय राऊत यांनी चहापानाला बोलावलं होतं. याशिवाय शिवसेनेच्या खासदारांना देखील त्यांनी बोलावलं होतं. या चहापानला भाजपचे आमदार आलेले नाहीत. मात्र, शिवसेनेचे खासदार, आमदार चहापानाला उपस्थित राहिले आहेत. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार हे देखील संजय राऊत यांच्या निवासस्थानी चहापानाला पोहोचले होते.

- Advertisement -

शिवसेनेच्या या खासदारांनी लावली उपस्थिती

खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर, हेमंत पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, ओम प्रकाश निंबाळकर, हेमंत गोडसे, श्रीरंग आप्पा बारणे

- Advertisement -

या आमदारांनी लावली उपस्थिती

निलम गोर्हे, मनिषा कायंदे, दादाजी भुसे, रोहित पवार

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -