घरताज्या घडामोडीपुण्यात डोमेस्टिक फ्लाईट्सच्या प्रवाशांचे Covid-19 स्क्रिनिंग रद्द - अजित पवार

पुण्यात डोमेस्टिक फ्लाईट्सच्या प्रवाशांचे Covid-19 स्क्रिनिंग रद्द – अजित पवार

Subscribe

पुण्यात देशाअंतर्गत डोमेस्टिक फ्लाईट्समधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्क्रिनिंगची आणि चाचणीची अट रद्द करण्याचा निर्णय पुण्यासाठी घेत असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ज्या प्रवाशांनी दोन कोरोना विरोधी लसीचे डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींसाठी या स्क्रिनिंगमधून सूट देण्यात येईल. अनेक नागरिकांकडून याबाबतच्या तक्रारी आल्यानेच पुण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र ही केंद्राच्या नियमावलीनुसारच स्क्रिनिंग आणि चाचणी होईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले. आज पुण्यात आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते.

अनेक नागरिकांनी एअरपोर्टच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताटकळत रहावे लागत असल्याने गैरसोय होत असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये प्रवासाच्या कालावधीपेक्षाही स्क्रिनिंग आणि चाचणीसाठीचा वेळ लागत असल्याची प्रवाशांची तक्रारी होती. दोन तासांचा प्रवास करून तीन तास स्क्रिनिंगसाठी थांबावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पण जागतिक पातळीवर आलेल्या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा आरोग्य विभाग जो निर्णय घेणार तो अंमलात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी केंद्राच्या सूचनेनुसारच जी नियमावली असेल ती अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कोणाला सवलत ?

देशाअंतर्गत प्रवास करून आलेल्या डोमेस्टिक फ्लाईट्सने पुण्यात दाखल झालेल्या प्रवाशांना स्क्रिनिंग आणि चाचणीत सवलत देण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांनी दोन कोरोनाविरोधी डोस घेतला आहे, अशा व्यक्तींना स्क्रिनिंगमधून सवलत देण्यात येणार आहे. पण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांसाठी मात्र स्किनिंग सक्तीचे असणार आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -