घरमहाराष्ट्रAjit Pawar : 'मराठा समाजाला त्यांच्या न्याय, हक्काचं आरक्षण असायला हवं'; अजित...

Ajit Pawar : ‘मराठा समाजाला त्यांच्या न्याय, हक्काचं आरक्षण असायला हवं’; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Subscribe

ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडं कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं OBCमध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गानी आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही? असे सुद्धा अजित पवारांनी यावेळी सांगितले.

कर्जत (रायगड) : मराठा समाजासाठी त्यांचा न्याय, हक्काचं स्वतंत्र आरक्षण असायला हवं. ही आपली ठाम भूमिका आहे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यायला हवी. आणि त्यासाठीच जनगणना व्हायला व्हावी हवी. ही आपली मागणी आहे. अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. ते कर्जत येथे आयोजित वैचारिक मंथन शिबिरात बोलत होते. (Ajit Pawar Maratha community should have their justice reservation of rights Ajit Pawar explained the role)

ज्या मराठा समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांच्याकडं कुणबी असल्याचे ऐतिहासिक कायदेशीर नोंदी असलेले दाखले आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार कुणबी समाजाचं OBCमध्ये असणारं आरक्षण मिळायला हवं. यात चुकीचं काय? कायदेशीर प्रक्रिया पार पाडून लोकांनी लोकशाही मार्गानी आरक्षण मिळण्याचा अधिकार कोणी कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही? असे सुद्धा अजित पवारांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले की, जाती-जातीत विष कालवण्याची भाषा आणि कृती कृपा करून या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी करू नये. एकमेकांना धमक्या या कोणी देऊ नये. हा अजित पवार राजकारणात असेपर्यंत कोणालाही दंगली घडवून गरिबांचं रक्त सांडायला देणार नाही. कोणाला तरी चिथावणी तसंच पोराबाळांचं करीअर उध्वस्त होऊ देणार नाही. हीच माझी भूमिका आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हाच आपला विचार आहे. हाच विचार आणि संदेश आपल्याला भागाभागामध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका त्याठिकाणी मांडायची आहे. एकीकडं हे इतिहासाकडं बघत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. माझी आपल्याला विनंती आहे की, आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शेवटच्या माणसाला विनंती आहे की, वेगवेगळ्या समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. जसं बिहार राज्याने दहा टक्के आरक्षण वाढवलं, आरक्षणाची मर्यादा वाढवली. आपल्याकडे मागं इजा,बिजा झालेली आहे. तेव्हा उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही, आता तिजा होऊन द्यायची नाही आता आरक्षण देताना दुसऱ्या कुठल्याही घटकावर अन्याय न होता ते आरक्षण देण्याच्या बद्दलचं सगळं जे काही करायची असते मागास आयोग असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील शिंदे समिती असेल त्या ते तपासत आहे. तेव्हा कुणीही काहीही चिंता करण्याची काहीही गरज नसल्याचेही आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.

हेही वाचा : NCP VS NCP : ‘तुम्हीही चार वेळा भाजपसोबत बोलणी केली ते चालतं!’; भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा 

- Advertisement -

आमच्यात कुठलाही मतभेद नाही

सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याबद्दल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण त्याठिकाणी प्रयत्न करतोय, त्याच्यात कुठंही आमच्यात मतभेद नाही. कधी-कधी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होतात त्या बातम्यामध्ये काहीही अर्थ नसतो असेसुद्धा यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -