घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबिले मंजुरीसाठी १ लाख ४ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास अटक

बिले मंजुरीसाठी १ लाख ४ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास अटक

Subscribe

मंजूर व बांधकाम सोसायटीच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून १ लाख ४ हजार रूपयांची लाच घेताना गुरूवारी (दि.३०) वाढोलीच्या ग्रामसेवकास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. अनिलकुमार मनोहर सुपे (४६) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत तेथील गावाचे विविध कामे तक्रारदार ठेकेदाराने घेतली होती. ही कामे ठेकेदाराने दिलेल्याम मुदतीत पुर्ण केली. यापैकी काही देयकांची रक्कम ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला मिळाली आहे. मात्र, काही कामाच्या देयकाची रक्कम २ लाख ९९ हजार ७७६ रूपयांचे देयक मिळालेले नाही. याबाबत ठेकेदाराने ग्रामसेवक संशयित सुपे याच्याकडे विचारणा केली. हे देयक मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापूर्वी ठेकेदाराने केलेल्या कामाचे देयके मंजूर केलेले आहेत, यासाठी बक्षीस म्हणून ७० हजार रुपये व सर्व देयकांचे ऑडिट करण्याचे ४ हजार रुपये असे एकूण १ लाख ४ हजार रुपयांची लाच संशयित अनिलकुमार सुपे यांनी मागितली व ती रक्कम गुरूवारी संध्याकाळी सीबीएस परिसरात स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक नीलिमा केशव डोळस, नाईक संदीप हांडगे, प्रभाकर गवळी, सुरेश चव्हाण यांच्या पथकाने त्यास लाच घेताना पकडले. त्याच्याविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -