घरमहाराष्ट्रAjit Pawar On Deshmukh : देशमुख म्हणाले- 'मी मंत्रिमंडळात नाही तर सोबत...

Ajit Pawar On Deshmukh : देशमुख म्हणाले- ‘मी मंत्रिमंडळात नाही तर सोबत नाही’; दादांचा गौप्यस्फोट

Subscribe

कर्जतमध्ये आयोजित दोन दिवशीय वैचारिक मंथन शिबिरानंतर अजित पवार यांनी मराठा आरक्षणा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

कर्जत (रायगड) : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये पार पडलेल्या वैचारिक मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक ना अनेक खुलासे केले. या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला. सत्तेत सहभागी होताना अनिल देशमुख यांनी मी मंत्रिमंडळात नाही तर तुमच्या सोबत नाही असे म्हटले होते. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar On Deshmukh  Deshmukh said If I am not in the cabinet I am not with Dadas secret explosion)

कर्जतमध्ये आयोजित दोन दिवशीय वैचारिक मंथन शिबिरानंतर अजित पवार यांनी मराठा आरक्षणा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना ओबीसीतून कुबणी जात प्रमाणपत्र देण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सत्तेत सहभी होतांना काय-काय घडले याबाबत खुलासा केला.
याआधी त्यांनी कोणत्या जागेवर ते उमेदवार उभे करणार याबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, बारामतीसह चार जांगावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिल्यावर बाकीचे कोण काय करणार आहेत त्याचं मी काय सांगू? मी आज राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, चारही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिले जातील आणि ते निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं जाईल असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

- Advertisement -

हेही वाचा :

सत्तेत सहभागी होतानाच्या घटनेवर टाकला प्रकाश

अनिल देशमुख पण आमच्याबरोबर होते. या सगळ्या बैठकीला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपाकडे जेव्हा मंत्रिमंडळाची यादी गेली तेव्हा ते म्हणले की, आम्ही यांच्याबद्दल सभागृहात बेरच आरोप केलेले आहेत, आणि लगेच मंत्रिमंडळात त्या आम्ही त्यांना घेतोय तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं, त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मी मंत्री नाही तर मी तुमच्याबरोबर नाही असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -