घरठाणेआपले सर्व कार्य भारत मातेच्या चरणी अर्पण करावे - डॉ. उज्वला चक्रदेव

आपले सर्व कार्य भारत मातेच्या चरणी अर्पण करावे – डॉ. उज्वला चक्रदेव

Subscribe

५७ व्या कोंकण प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन

कल्याण : इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिशा आहे कारण तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा भाग आहे. आपले सर्व कार्य भारत मातेच्या चरणी अर्पण करावे असे आवाहन एसएनडीटी विद्याविठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. कल्याणमध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मैदान येथे होत असलेल्या ५७ व्या कोंकण प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री ॲड. अमित ढोमसे, स्वागत समिती अध्यक्ष प्रा. महेश भिवंडीकर, स्वागत समिती सचिव प्रसाद कुलकर्णी, शहर अध्यक्ष प्रा. प्रीती भरणुके, शहर मंत्री भूमिका देशपांडे या उपस्थित होत्या.

संघटन म्हणजे काय, आपल्या सारखे काम करणारे सहकारी इतर गावात कसे काम करतात याची माहिती याठिकाणी होते. भारतातील इतर तरुणांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. कारण त्यांना त्यांच्या आयुष्याचे धेय्य विचारावे लागते. त्यांना त्यांचे धेय्य ठरवा असे सांगावे लागते. मात्र तुम्हाला ते सांगायची आवश्यकता नाही कारण तुम्ही तुमचे धेय्य ठरवले आहे. भारत माते बद्दलचं प्रेम तुमच्या मनात प्रज्वलित झालं असून प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात नेटाने काम करून भारत मातेचे काम करू शकतो.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज सबळ झाले ते मावळ्यांमुळे. तुम्ही देखील मावळ्यांप्रमाणे भारत मातेची ताकद बना. तसेच संघटनेला देखील शरीर आहे आणि त्याला विविध अंगे देखील आहेत. तुम्ही संघटनेचे कोणते अंग आहात हे तुम्ही ठरवले पाहिजे. भारताला कशाची गरज जास्त आहे याची तुम्हाला जाण हवी त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे चक्रदेव यांनी सांगितले.

तर राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषेची व्याप्ती वाढत आहे. विद्यार्थी परिषद आठ हजार गावांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनापूर्वी सदस्यांची संख्या ३५ लाख इतकी होती. कोरोना काळात १० लाख सदस्य ऑनलाईन पद्धतीने जोडले गेले. आता विद्यार्थी परिषदेची संख्या ४५ लाख इतकी झाली आहे. विद्यार्थी शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे. आजच्या विद्यार्थी परिषदेतून कोकण दर्शन होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देशात जेव्हा नरसंहाराच्या घटना घडतात, तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते एकत्र उभे असतात असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कल्याण हे इतिहासिक शहर आहे. या शहरात परिषद होत असल्याने विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या शहराचे महत्त्व आणि तेथील इतिहासिक वास्तूंचे महत्त्व समजण्यासाठी प्रदर्शनात छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. कल्याणचा इतिहास, खाद्य संस्कृती, कल्याणातील समाजरत्न, संविधान, स्वतंत्र संग्रमातील जनजाती नायकांचे योगदान याची माहिती ठेवण्यात आली आहे. त्याचरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुरू असलेल्या कर्यक्राचे आणि कामाचे स्वरूप याचे दर्शन घडवणारे काही माहितीपर फोटो लावण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -