घरमहाराष्ट्रअमिताभ गुप्ता यांची ९० तासांमध्ये पुन्हा बदली

अमिताभ गुप्ता यांची ९० तासांमध्ये पुन्हा बदली

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९० तासांतच दुसर्‍यांदा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शनिवारी पुन्हा बदली करीत जोर का धक्का दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९० तासांतच दुसर्‍यांदा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची शनिवारी पुन्हा बदली करीत जोर का धक्का दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरा अमिताभ गुप्ता यांना पुण्याच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवत अपर पोलीस महासंचालकपदावर (कायदा व सुव्यवस्था) नियुक्त केले होते, मात्र शनिवारी दुपारी पुन्हा गुप्ता यांची बदली अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आल्याने फडणवीस यांनी गुप्ता यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. हे तेच गुप्ता आहेत ज्यांनी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध बिल्डर वाधवान कुटुंबीयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी रेड कार्पेट घालून दिले होते. गुप्ता यांची जवळीक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी असल्याने फडणवीस यांनी गृहमंत्री झाल्यावर भाकरी फिरवत अनेक आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

नुकत्याच राज्यात ४ दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. यात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांच्यावर अपर पोलीस महासंचालकपदाची (कायदा व सुव्यवस्था) जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र यास ४ दिवस पूर्ण होण्याच्या आतच गुप्ता यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. गुप्ता यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य, पुणे येथे करण्यात आली आहे, तर गुप्ता यांच्या जागी पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलीस सह आयुक्तपदी करण्यात आली आहे. नव्याने केलेल्या बदल्यांमध्ये आता रवींद्र शिसवे हे लोहमार्ग आयुक्त, मुंबई असतील.

राज्य पोलीस दलातील ८ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या
राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या अलीकडेच बढत्या आणि बदल्यांचे आदेश निघाले असताना आता उर्वरित ८ आयपीएस अधिकार्‍यांच्या शनिवारी गृहविभागाने बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात रवींद्र शिसवे यांची मुंबईच्या लोहमार्गच्या पोलीस आयुक्तपदी, तर संजय मोहिते यांची नवी मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच राज्य पोलीस दलातील काही अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यापैकी काही अधिकार्‍यांच्या बदल्यांचे ठिकाण दाखविण्यात आले होते. अखेर शनिवारी या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या ८ अधिकार्‍यांमध्ये महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र शिसवे यांची मुंबई लोहमार्गच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

अन्य अधिकार्‍यांमध्ये महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक यांची पुण्याच्या कारागृह आणि सुधारसेवा विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक, मुंबईच्या विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांची नवी मुंबईच्या सहपोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उपायुक्त सुरेशकुमार मेंगडे यांची नवी मुंबईच्या सिडको मुख्य दक्षता अधिकारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त, बदलीच्या प्रतीक्षेत असलेले सुहास वारके यांची महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्थेच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, संजय दराडे यांची मुंबईच्या विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -