घरट्रेंडिंगVideo:अमोल कोल्हे यांच्या एकांतवासाचं गुपित आलं समोर

Video:अमोल कोल्हे यांच्या एकांतवासाचं गुपित आलं समोर

Subscribe

मागील काही दिवस, वर्षांपासून बेभान होऊन धावत राहिलो मात्र आता वेळ आली आहे, एकांतवासात जाण्याची असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडियावर 7 नोव्हेंबर रोजी  केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टनंतर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर अमोल कोल्हे यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी आपले मतही मांडले आहे. आतापर्यंतच्या धावपळीत अनेक टीका केल्या टोकाचे निर्णय घेतले तसेच अनपेक्षित पावलं उचलले असल्याचे अमोल केल्हेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या पोस्टवरुन राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाल्या होत्या अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते…

खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत एकांतवासात जात असल्याची माहिती दिली होती.   यानंतर त्यांच्या चाहत्यांसह राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.मात्र आता अमोल कोल्हे यांनी एकांतवासात का गेले होते आणि त्यांनी काय केलं याचा उलगडा केला आहे.

- Advertisement -

एकांतवासाबद्दल दिली माहिती

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या एकांतवासामागील पोस्टचे स्पष्टीकरण दिले आहे अमोल कोल्हे  म्हणाले की,  एकांतवासात जाण्यामागे माझा कोणत्याही प्रकारचा  राजकीय उद्धेष नव्हता.  मानसिक थकवा स्वीकारणं ही काळाची गरज असं आहे असं म्हणत .अमोल कोल्हे यांनी या एकांतवासाला नकारात्मक दृष्टीने पाहिलं गेल्याबद्दल खंत व्यक्त केली

यासह माझ्या एकांतवासाबाबत अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. काहींनी तर राजकीय पक्षांतरबाबत देखील भाष्य केलं. मात्र माझ्या एकांतवासात जाण्याचं कारण होतं मानसिक विश्रांतीचं आहे, असं ते म्हणाले. आपण व्यक्त कुठं व्हायचं हा प्रश्न उभारतो आणि मग साचलेपण येत. त्यातून मधुमेह, हृदयविकार असे अनेक विकार समोर येतात. त्यामुळे व्यक्त होणं, मोकळं होणं महत्वाचं आहे. व्यक्त होणं हे जीवंतपणाचं लक्षण आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एकांतवासाबद्दल सविस्तर व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

 

व्हिडिओ पाहा

अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जाण्यापूर्वी काय पोस्ट केली होती

सिंहावलोकनाची वेळ, गेल्या काही दिवसांत, महिन्यात आणि वर्षात बेभान होऊन धावत राहिलो यादरम्यान काही टोकाचे निर्णयही घेतले आणि अनपेक्षित पावलं उचलली असल्याचे कोल्हेंनी कबूल केले आहे. परंतु हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणित, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक, शारीरिक आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं थोडं मनन आणि थोडं चिंतन, घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा, त्यासाठी एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू.नव्या जोमाने, नव्या जोशाने असे अमोल कोल्हे म्हणाले असून शेवटी त्यांनी फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही अशी टीप दिली आहे.


हे हि वाचा – मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त असल्यामुळे मानेचा त्रास झाला, किरीट सोमय्यांचा घणाघात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -