घरताज्या घडामोडीगडचिरोलीत मोठी कारवाई! देशातील सर्वात मोठा नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार?

गडचिरोलीत मोठी कारवाई! देशातील सर्वात मोठा नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार?

Subscribe

देशातील नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या असून मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी ५० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोर तालुक्यातील ग्यारापत्ती कोटगुल परिसरात नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवळपास २६ नलक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांना मोठे यश आले असून २६ नक्षलवाद्यांमध्ये देशातील मोठा नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडेही ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून या वृत्ताबाबत कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मागच्या ३ वर्षात केलेली ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. मिलिंद तेलतुंबडे हा देशातील नक्षलवाद्यांचा मुख्य म्होरक्या असून मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी ५० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गेली अनेक दिवस पोलीस त्याच्या शोधात होते.

- Advertisement -

या चकमकी दरम्यान पोलीस पथकाचे ४ जवान जखमी झाले आहे. जखमी झालेल्या ४ जवानांना होलिकॉप्टरच्या साहाय्याने नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धानोर तालुक्यातील कोटगुलच्या घनदाट जंगलात पोलिसांचे सी – ६० दल गस्ती घातलाना नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. सी-६० दलाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलीस अधीक्षर अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे’ अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली, असे गृहमंत्री म्हणाले


हेही वाचा – गडचिरोलीत पोलिसांची माओवाद्यांसोबत चकमक, २६ माओवादी ठार तर ३ पोलीस जखमी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -