घरमहाराष्ट्रअनिल बोडेंचं वादग्रस्त वक्तव्य, अन् यशोमती ठाकूर यांचं चोख प्रत्युत्तर; पुन्हा...

अनिल बोडेंचं वादग्रस्त वक्तव्य, अन् यशोमती ठाकूर यांचं चोख प्रत्युत्तर; पुन्हा एकदा ठाकूर-बोंडे आमने सामने

Subscribe

काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा डीएनए, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. त्याला आता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमरावती: काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर पदवी मिळाली. ठाकूरांमध्ये इंग्रजांचा डीएनए, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. त्याला आता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.( Anil Bonde s controversial statement and Yashomati Thakur s sharp reply Once again Thakur Bonde face off )

” अनिल बोंडे यांना नैराश्य आलं आहे. त्यांना इतिहास कळत नाही. मी महिला आमदार आहे, महिलांचा मान सन्मान कारायचा असतो, हे त्यांना माहित आहे की नाही? असा सवाल यशोमती ठाकर यांनी उपस्थित केला आहे. “ठाकूर घराणं मोठं घराणं आहे. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ठाकूर घराणं लढलं आहे. त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. तो इतिहास तुमच्या घराण्याला नाही, त्याला मी काय करू? असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

- Advertisement -

काय म्हणाले बोंडे?

भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा डीएनए महात्मा गांधींचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे, असंही बोंडे म्हणाले.

यशोमती ठाकूर यांचं चोख प्रत्युत्तर

अनिल बोंडे यांचा वेडेपणा सुरू आहे. अनिल बोंडे सध्या नैराश्यामध्ये आहेत. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे. आमच्या मतदारसंघात येऊन बोलता मी महिला आहे. महिलांचा मान सन्मान करायचा, हे बोंडे यांना कळत नाही का? अशी जोरदार टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

यशोमती ठाकूर म्हणाल्या की आडनावावरून जर राजकारण होणार असेल, तर बोंडेंच्या बोंडअळ्या कशा आल्या हे विचारायचं का? असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, जनसामान्यांची कामं झाली पाहिजेत, संत्र्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे भाव घटले आहेत, यावर कोणी बोलत नाही, अशी खंत ठाकूर यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा: महायुतीत अजित पवारांना 100 दिवस पूर्ण; सरकारसोबत जाण्याचे सांगितले कारण )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -