घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अनिल देशमुखांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीच्या ७ व्या नोटीसीनंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. यानंतर ईडीने ८ तासांहून अधिक तास चौकशी करत त्यांना अटक केली. दरम्यान ईडीने मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या ईडी कोठडीची मागणी केली, मात्र सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर ईडीने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीचा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची आत्ता १४ दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी होणार आहे.

अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरीक्षक सचिन वाझेने १०० कोटी रुपयांच्या वसूलीचे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात न्यायालयात गेले असता न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणी कारवाईस सुरुवात केली आहे. त्यामुळे सीबीआय आणि ईडी अश्या दोन्ही तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करत भष्ट्राचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळी केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. तर सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -