घरमहाराष्ट्रभाजप खासदाराच्या घराबाहेर अण्णा समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजप खासदाराच्या घराबाहेर अण्णा समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

अनिल हजारे असं या आत्मदहन करण्याऱ्या अण्णांच्या समर्थकाचे नाव आहे. त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोलवाली पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

देशात लोकायुक्त आणि लोकपाल व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अण्णांच्या उपोषणाचा दखल घेतली जात नसल्यामुळे तसंच अण्णांची तब्बेत अधिक खालावत चालली असल्यामुळे अण्णांचे समर्थ आक्रमक झाले आहेत. अशाच अण्णांच्या एका समर्थकाने भाजपच्या खासदाराच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी या समर्थकाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

खासदाराच्या घरावर मोर्चा

जनलोकपालासाठी अण्णा हजारेंच्या उपोषणाला चांगला पाठिंबा मिळत आहे. अण्णांच्या समर्थकांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी अहमदनगर शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चा दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अण्णांच्या काही समर्थकांनी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या घरावर जोरदार मोर्चा काढला. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. आज दुपारी अण्णांच्या एका समर्थकाने दिलीप गांधी यांच्या घराच्या गेटला बांगड्यांचा आहेर लटकवून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

आत्मदहन करणाऱ्याला घेतले ताब्यात

अनिल हजारे असं या आत्मदहन करण्याऱ्या अण्णांच्या समर्थकाचे नाव आहे. त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी असलेल्या जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि हर्षद म्हस्के यांनी रोखल्यामुळे अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतेल. कोलवाली पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचा सहावा दिवस असून अण्णांनी आंदोलन मागे घेतले नाही. सुभाष भामरे आणि गिरीश महाजन या दोन्ही मंत्र्यांनी अण्णांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

केंद्र सरकारच्या प्रस्तावावर अण्णा असमाधानी; उपोषण सुरुच राहणार

सत्ता मिळवण्यासाठी भाजपने माझा वापर केला – अण्णा हजारे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -