घरमुंबईमहापालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प स्वप्न दाखवणारा - रवी राजा

महापालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प स्वप्न दाखवणारा – रवी राजा

Subscribe

महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती समोर सादर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले.गेल्या वर्षी आरोग्यासाठी ३६०० कोटी रुपयांचे बजेट सादर करूनही सेवा-सुविधा मिळाल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती समोर सादर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले. सत्ताधारी स्वप्न दाखवण्याचे काम करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. या अर्थसंकल्पात मालमत्ता कर कुठेही माफ केलेला दिसत नाही, सेवा कर लागू करणार हे निषेधार्य आहे. आम्ही याचा निषेध करणार, असे रवी राजा यांनी सांगितले.

सेवा सुविधा मिळाल्या नाही

यंदा ४५०० कोटी रुपयांचे आरोग्य बजेट सादर करण्यात आले आहे. गेल्या वर्षी आरोग्यासाठी ३६०० कोटी रुपयांचे बजेट सादर करूनही सेवा-सुविधा मिळाल्या नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाने बजेट सादर केले आहे, घोषणा करुनही मुलुंड लिंक रोड, सी लिंक, टनेलचे काम रखडले असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या वर्षी रस्त्यासाठी १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्या भागात पावसाळ्यात पाणी भरते त्यासाठी नवीन प्रकल्प सादर केलेला नाही. फक्त स्वप्ने दाखवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले अशी टीका रवी राजा यांनी केली. बेस्टला बंद करण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे. बेस्टला संपावण्याचा डाव शिवसेना रचत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -