घरमहाराष्ट्रठाकरे गटाला आणखी एक धक्का; भरत गोगावले यांचा व्हीप होणार लागू; Rahul...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; भरत गोगावले यांचा व्हीप होणार लागू; Rahul Narwekar यांची माहिती

Subscribe

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी (10 जानेवारी) दिला. दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मात्र निकाल देताना शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष देण्यात आल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. तसेच निकाल देताना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिलेल्या व्हिपला त्यांनी अधिकृत मान्यता दिली होती. यानंतर आता भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटालाही लागू होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. (Another blow to the Thackeray group Bharat Gogawle whip will also apply Information by Rahul Narwekar)

हेही वाचा – MLA Disqualification Case : प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया म्हणाले; “उद्धव ठाकरे यांच्याबद्दल…”

- Advertisement -

निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे. भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य मानत त्यांचा व्हिप मान्य करण्यात आला असून, विधिमंडळ पक्ष ज्यांचा त्यांचाच पक्ष, असेही राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना स्पष्ट केले होते. यानंतर आता स्पष्टीकरण देताना सांगितले की, एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाही. मी ज्यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली. त्यांचा व्हीप आता सर्वांना लागू होईल. ठाकरे गटातील आमदार ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत, त्या गटातील प्रतोदाचा व्हीप त्यांना लागू होईल. मात्र सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभु यांची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवली आणि भरत गोगावले यांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा समज गैरसमज समाजात पसरवला जात आहे, असा आरोप राहुल नार्वेकर यांनी दिला.

भरत गोगावले यांच्या व्हिपबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, नरहळी झिरवळ यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची निवड केली होती, त्यामुळे म्हणजेच 21 जून 2022 रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचे पत्र होते, एकनाथ शिंदे यांचे पत्र नव्हते, असे कोर्टानं म्हटले आहे. त्यामुळे कोर्टाला एकच राजकीय पक्ष असल्याचे वाटले आणि त्यांनी दोघांची निवड केली होती. पण 3 जुलै 2022 रोजी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत मी निर्णय घेतला, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification : कायदेशीर बाबींचे पालन, चूक न करता निर्णय घेण्याचा प्रयत्न; नार्वेकरांनी केले स्पष्ट

राहुल नार्वेकर म्हणाले की, 3 जुलै 2022 रोजी माझ्याकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोघांची पत्रे होती. त्यांच्या पक्षात फूट पडली अशी मला कल्पना होती. त्यावेळी मी केवळ विधिमंडळातील ताकद पाहून गोगावले आणि शिंदेंची केलेली निवड चुकीची होती. कारण, त्यावेळी मला फक्त राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायला होतं. त्यामुळे राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवताना प्रतोद आणि पक्षनेता ठरवले, मात्र तो भाग चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावे आणि त्यांनतर प्रतोद व विधिमंडळ नेत्यांची निवड करावी, असे निर्देश दिले होते. असे असतानाही आता गैरसमज पसरवला जात आहे. परंतु मी जो निर्णय दिला आहे, तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन्स 100 टक्के पाळून दिला आहे, असेही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -