घरमहाराष्ट्रराज्यात पुन्हा बंडाचे वारे? बच्चू कडू म्हणतात...

राज्यात पुन्हा बंडाचे वारे? बच्चू कडू म्हणतात…

Subscribe

हे खळबळजनक विधान करताना बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचेही ठामपणे सांगितले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतात आहे. आमच्या सरकारमधील २० ते २५ आमदार फुटले तरी हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील आमदार आमच्याकडे येण्यास इच्छूक आहेत. मात्र कोर्टातील प्रकरणामुळे पक्षप्रवेश लांबत आहे. 

मुंबईः राज्यात पुन्हा बंड होणार असून येत्या १५ दिवसांत महाविकास आघाडीतले २० ते २५ आमदार फुटून शिंदे गट- भाजपात प्रवेश करणार आहेत, असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने फुटणाऱ्या आमदारांविषयी चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

हे खळबळजनक विधान करताना बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचेही ठामपणे सांगितले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतात आहे. आमच्या सरकारमधील २० ते २५ आमदार फुटले तरी हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील आमदार आमच्याकडे येण्यास इच्छूक आहेत. मात्र कोर्टातील प्रकरणामुळे पक्षप्रवेश लांबत आहे.

आमदार आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. त्यावर बच्चू कडू म्हणाले, आदित्य ठाकरे यांना निवडणुकीची एवढीच हौस असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. मुळात आता आव्हान देणे हा बालिशपणा आहे. या आव्हानाला आता काहीच अर्थ नाही. जेव्हा विधानसभा निवडणूक जाहिर होईल. तेव्हा हे आव्हान दिले पाहिजे, तर ते योग्य ठरेल.

- Advertisement -

मात्र गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला होता. विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, पण मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर याचा फटका शिंदे-फडणवीस सरकारला बसू शकतो. राज्यात एका मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री असल्याने लोकांची कामे होत नाहीत. अशावेळी तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला तर लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे संकेत बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले होते. तर दुसरीकडे गुरुवारी बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे भाकीत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -