घरठाणेशुभ दीप बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

शुभ दीप बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

Subscribe

भेट वस्तूंसह शुभेच्छांचा मुख्यमंत्र्यांवर वर्षाव

रात्रीचे बारा वाजल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. याचदरम्यान महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांवर छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांची प्रेमाने आणलेल्या भेट वस्तुंद्वारे जणू शुभेच्छांचा वर्षाव पाहण्यास मिळाला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस असल्याने शुभ दीप शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी पाहण्यास मिळाली. तर शिंदे यांनी आपल्या किसननगर येथील जुन्या घराला भेट दिली. आणि तेथे आपल्या जुन्या आठवणींमध्ये ते नाहून निघाले. याचवेळी त्यांनी तेथील शाखेला ही भेट दिली. तसेच शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतला. तेथील लहान मुलांसह केक कापून वाढदिवस साजरा केला.

फेब्रुवारी महिना हा शिंदे कुटुंबियांसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जणू आनंदाची पर्वणी देणारा महिना आहे. या महिन्यात एक नाहीतर तिघांचे वाढदिवस. आजोबापासून नाताचा असे तिघांचे वाढदिवस असल्याने शुभ दीप हे मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील निवासस्थान आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून विद्युर रोषणाईने नटलेले आणि सजलेले आहे. 9 फेब्रुवारी हा मुख्यमंत्री यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्रीचे वाजल्यापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिंदे हे बारा नंतर ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. याचदरम्यान बंगल्याबाहेरच कार्यकर्त्यांना भेट त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कोणी पुष्पगुच्छ तर कोणी शाल आणि भेट वस्तू देत एक फोटो ही क्लिक केला.

- Advertisement -

उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यात येत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस असल्याने सकाळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट दिली. तसेच पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन केले. याचदरम्यान भाजपा आमदार निरंजन डावखरे हे सुद्धा हजर होते. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

ठाण्यातही कार्यक्रमांची रेलचेल
शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्‍यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. कोणी धान्य वाटप, कोणी क्रिकेटचे साहित्य, कोणी खाद्य पदार्थ वाटप केले. 9 रुपयांमध्ये 9 खाद्यपदार्थांची मेजवानी ठेवली आहे. पाणीपुरीचे मोफत वाटप केले. तर तलावपाळी येथील शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामान्यांचे आयोजन केले.

- Advertisement -

आरोग्य आणि महारक्तदान शिबिरे
ठाणे महापालिकापासून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनामार्फत महाआरोग्य आणि महारक्तदान, लसीकरण आणि मोतीबिंदू शिबिरांचे आयोजन केले.

सव्वा किलोचा कंदी पेढ्यांचा हार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा असणार्‍या सातार्‍यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क कंदी पेढ्यांचा हार घेऊन सातारकर आले होते. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते सकाळीच सातारचे सुप्रसिद्ध लाटकरबंधू पेढेवाले यांनी बनवलेला कंदी पेढ्याचा हार घेऊन आलेत. एकूण सव्वा किलोचा हा हार असून त्यामध्ये 75 पेढ्यांचा समावेश होता.

खारीक खोबर्‍याचा हार भेट
नांदेड जिल्हाच्या लोहामतदार संघातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी खारीक खोबर्‍याचा हार भेट म्हणून आणले. जिल्ह्यातील मण्याड खोर्‍यातील ही परंपरा असून हा 21 किलोचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

शिंदेंना अजूनही जुन्या घराची ओढ
शिंदे यांनी सकाळी किसननगर येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिंदे यांनी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच दुसर्‍या एका मंदिराचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी किसननगर येथील शाखेला ही भेट दिली. तसेच तेथील काही कार्यक्रमाचे ही उद्घाटन केले आणि लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. याचदरम्यान त्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले.

आनंद आश्रमाला रोषणाई, शिंदेंचा कटआऊट
शुभ दीप बंगल्याप्रमाणे टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमाला रोषणाई केली होती. याचदरम्यान तेथील आनंद दिघे यांच्या अर्धा पुतळ्याच्या परिसरात ही रोषणाई केली. याचदरम्यान आश्रम येथे स्टेज उभारण्यात आले आहे. तेथेही मुख्यमंत्री येणार असल्याने कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळले. याशिवाय टेंभीनाका परिसरात शिंदे यांचे मोठा कट आऊट उभारण्यात आलेला आहे.

दिघे यांच्या शक्तीस्थळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात येण्यापूर्वी दिवंगत आनंद दिघे यांना शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर ते आनंद आश्रम रवाना झाले. आश्रमावर जगदाळे यांची हजेरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभीनाका येथील आनंद आश्रमात कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मुख्यमंत्र्यांची दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तेथे जाऊन शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -