घरमहाराष्ट्रPolitics : अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये अबोला कायम; कार्यक्रमात एकत्र, मात्र...

Politics : अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये अबोला कायम; कार्यक्रमात एकत्र, मात्र संवाद नाही

Subscribe

महायुतीसाठी त्यांनी आपली नाराजी बाजूला ठेवत 15 दिवसांपूर्वीच राजकीय वैमनस्य विसरून ते रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी एका व्यासपीठावर आले. मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये अद्यापही अबोला कायम असल्याचे चित्र आहे. 

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर नाराज होते. मात्र महायुतीसाठी त्यांनी आपली नाराजी बाजूला ठेवत 15 दिवसांपूर्वीच राजकीय वैमनस्य विसरून ते रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी एका व्यासपीठावर आले होते. असे असले तरी दोघांमध्ये अद्यापही अबोला कायम असल्याचे चित्र आहे. (Arjun Khotkar and Raosaheb Danav Abola remains)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून भाजपाने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी दिली आहे. रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या कल्याण काळे यांना रिंगणात उतरवले आहे. सध्याच्या घडीला रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर नाराज आहेत. रविवारी जालना शहरात ब्राह्मण समाजाच्या उपनयन कार्यक्रमांमध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांनी आज हजेरी लावली, मात्र दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास अर्धा तास एकाच कार्यक्रमात असूनही दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीसाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही बिनसलेलंच आहे, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. जर या दोन्ही नेत्यांमध्ये अशीच नाराजी राहिली तर महायुतीला येत्या निवडणुकीत फटका बसू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय जातींभोवती; नेत्यांकडूनही हीच रणनिती

शिवसैनिकही रावसाहेब दानवेंच्या प्रचारापासून दूर (Shiv Sainiks away Raosaheb Danve’s propaganda)

रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फक्त अर्जुन खोतकर नाराज आहेत, असं नाही तर शिवसैनिकही नाराज आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकही महायुतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. दोन्ही नेत्यांच्या नाराजीचा महायुतीला निवडणूक फटका बसायला नको, त्यामुळे अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार कोण घेणार? अशी चर्चा भाजपा पदाधिकारी आणि कार्यकरर्त्यांमध्ये सुरू आहे.

- Advertisement -

रावसाहेब दानवेंची संपत्ती किती? (Raosaheb Danve’s wealth?)

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी अलीकडेच लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. शपथपत्रात नमूद  केल्याप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाकडे स्थावर 42 कोटी आणि जंगम 59 लक्ष 82 हजार रुपयांची संपत्ती आहे. दानवे यांच्या उत्पनात गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंच्या यांच्या उत्पनात 6 लाख 24 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -