घरदेश-विदेशLive Update : महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Live Update : महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Subscribe

महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने एक दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर केली

- Advertisement -

19, 27 एप्रिल, 7, 13 आणि 20 मे या पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

22/3/2024 21:15:9

- Advertisement -

IPL 2024 : बंगळुरु संघाने जिंकले नाणेफेक, फलंदाजीचा निर्णय

22/3/2024 19:41:41


अरविंद केजरीवाल यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी

मद्य धोरण प्रकरणी गुरुवारीच झाली होती अटक

22/3/2024 18:49:7


एलविश यादवला जामीन मंजूर

22/3/2024 16:52:21


इकबाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती

पी. वेलरासू मंत्रालयातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सचिवपदी

22/3/2024 16:48:10


गोदान एक्सप्रेसच्या एका डब्याला आग

नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसच्या डब्याला आग

एक्सप्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

22/3/2024 16:10:57


अरविंद केजरीवाल हेच मद्य घोटाळ्याचे मास्टरमाईंड- ईडी

गोवा निवडणुकीत दारु घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आला- ईडी

22/3/2024 14:45:41


अंदर रहूँ या बाहर, देश के लिए काम करुँगा- केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात त्यांना आणण्यात आलं आहे. यावेळी माध्यमांसमोर त्यांनी हे विधान केलं.

22/3/2024 12:32:37


लोकसभेसाठी भाजपाकडून चौथी यादी जाहीर, 15 नावांच्या यादीत दोन महिलांचाही समावेश

भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने शुक्रवारी (22 मार्च 2024) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांच्या नावांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत दोन राज्यांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीत एकूण 15 नावे आहेत, त्यापैकी एक पुद्दुचेरीचे आहे, तर उर्वरित 14 तामिळनाडूचे आहेत. या सर्व 15 उमेदवारांमध्ये दोन महिला उमेदवारांचाही समावेश आहे.

पुद्दुचेरीतून भाजपने ए.नमस्वियम यांना संधी दिली आहे, तर तामिळनाडूमध्ये तिरुवल्लूरमधून पोन.व्ही.बालगनपती, उत्तर चेन्नईमधून आरसी पॉल कनागराज, तिरुवन्नमलाईमधून ए. अश्वथमन, नमक्कलमधून केपी रामलिंगम, तिरुपूरमधून ए.पी. .मुरुगानंदम, पोल्लाची येथील के.वसंतराजन, करूर येथील व्ही.व्ही. सेंथिलनाथन, चिदंबरम (SC), पी कार्तियायिनी (SC), नागपट्टिनम (SC), SGM रमेश, थंजुवर येथून एम. मुरुगनंदम, शिवगंगा येथून डॉ. देवनाथन यादव, प्रा. रामा श्रीनिवासन, प्रा. रामा श्रीनिवासन. विरुधुनगरमधून प्रा. रामा श्रीनिवासन, राधिका सरथकुमार आणि बी. जॉन पांडियन यांना टेंकासी (SC) येथून तिकीट देण्यात आले आहे.


अरविंद केजरीवालांनी सुप्रिम कोर्टातील याचिका घेतली मागे

खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने, केजरीवाल यांच्याकडून याचिका मागे

22/3/2024 12:22:8


प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला


उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज- चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरेंना वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. ते सध्या वैफल्यग्रस्त परिस्थितीत आहेत.ते बुद्धीभ्रंश झाल्यासारखे वागत आहेत. पंतप्रधान मोदींची औरंगजेबाशी तुलना केली जात आहे, यांना
महाराष्ट्राची, देशाची जनता माफ करणार नाही.

22/3/2024 11:33:20


केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीच्या आरटीओ परिसरात आंदोलनाला सुरुवात

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी काल, गुरुवारी ईडीने दोन तासांच्या चौकशीनंतर अटक केली. या अटकेविरोधात आता आम आदमी पक्षाकडून दिल्लीच्या आरटीओ परिसरात आंदोलन केले जात आहे.

22/3/2024 10:14:52


उमेदवारी मिळाल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी मानले मविआ नेत्यांचे आभार

लोकसभेची उमेदवारी छत्रपती शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले.

छत्रपती घराण्याला अतिशय गौरवशाली इतिहास आहे.
पुरोगामी लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज, असल्याचंही शाहू महाराज म्हणाले.

22/3/2024 9:38:40


बिहारच्या सुपौलमध्ये मोठा अपघात…; निर्माणाधीन पुलाचा गर्डर पडला; 9 कामगार गाडले गेले, एकाचा मृत्यू

बिहारमधील सुपौल येथील बकोर येथे शुक्रवारी सकाळी पुलाचा गर्डर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत अनेक मजूर गाडले गेल्याची माहिती आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे. बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

22/3/2024 8:39:24


प्रणिती शिंदेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न

भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दीत शिरून आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे

22/3/2024 8:32:28


कांद्याच्या दरात 400रुपयांची घसरण

22/3/2024 7:42:34


सोन्याला झळाळी! आजचा दर 69,300 रुपये तोळा


भयभीत हुकूमशहा… केजरीवाल यांना अटक होताच राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

22/3/2024 7:31:11

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुरुवारी अटकेची कारवाई करण्यात आली. ईडीकडून (प्रवर्तन निदेशनालय) ही कारवाई करण्यात आली.

यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र डागलं आहे. ‘भयभीत हुकूमशाहा, एक मृतावस्थेतील लोकशाही बनवू पाहतोय, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदी आज भुतानच्या दौऱ्यावर आहेत.


22/3/2024 7:31:11 गाझाच्या अल शिफा रुग्णालयात भीषण लढाई, इस्रायली सैन्याने हमासच्या 50 सैनिकांना ठार केले

गाझा सिटीच्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरात जोरदार लढाई सुरू आहे. हॉस्पिटलच्या संकुलातून इस्रायली सैनिकांवर हल्ला करणारे हमासचे 50 हून अधिक सैनिक गुरुवारी ठार झाले. येथे दोन इस्रायली सैनिकांचाही मृत्यू झाला आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -