घरमहाराष्ट्रपुणेगृह खात्याचा वचक नसल्याने..., सुप्रिया सुळे यांचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा

गृह खात्याचा वचक नसल्याने…, सुप्रिया सुळे यांचा पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या रडारवर सध्या उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यातील विविध गुन्हेगारीच्या घटनांवरून सुप्रिया सुळे यांच्याकडून फडणवीस यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. आताही पुण्यातील कोयत्या गँगच्या दहशतीवरून सुप्रिया सुळे यांनी, गृह खात्याचा वचक नसल्याचे सांगत, फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

हेही वाचा – ‘ईडी’ला कायदा कळत नाही का? गांधी परिवारावरील कारवाईवरून सिब्बल यांचा सवाल

- Advertisement -

पुण्याच्या वारजे परिसरात एका टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. अलीकडेच या परिसरात वाहने पेटवण्यात आली होती. त्यामुळे येथे दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश कम्पले ऊर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर या संशयितांना अटक केली आहे. अभिजीत विभिषण धावने (30) याने या प्रकरणी तक्रार दिली होती. या टोळक्याने त्याच्याकडील रोकड लूटली होती.

याच घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पुणे शहरातील उपनगरांमध्ये कोयता गॅंग तोडफोड करून दहशत माजवित आहे. गृह खात्याचा वचक नसल्याने असले किरकोळ गुन्हेगार देखील निर्ढावले असून पोलीसांना जुमानत नसल्याचे दिसून येते. गृहमंत्र्यांनी पुणे शहर व परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – India-Canada Tensions: भारत-कॅनडा संबंध पुन्हा रुळावर; सुमारे 2 महिन्यांनंतर व्हिसा सेवा सुरू

दोनच दिवसांपूर्वी हल्लाबोल

अकोला येथील एका गुंडाने एका चौदा वर्षांच्या मुलीचे मुंडन करून तिला सिगारेटचे चटके देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खदान पोलीसांनी त्या नराधमास अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री फडणवीस सपशेल अपयशी ठरल्याचा हा परिणाम आहे, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर शरसंधान केले होते. तर, भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन गट आमनेसामने आल्याची घटना अलीकडेच घडली होती. यावरून सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. याची सखोल चौकशी करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -