घरमहाराष्ट्रएमआयएमचा वंचितला तलाक

एमआयएमचा वंचितला तलाक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून वंचित आघाडीत सुरू असलेली धुसफुस अखेर काडीमोडानंतरच थांबली. वंचित आघडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेला एमआयएमने आपण आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी तसे जाहीर आहे. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे जाहीर करताना ओवेसी यांनी आघाडीला पूर्णविराम दिला. आता आगामी विधानसभा निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर पडणार असल्याचे पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते. मात्र, असदुद्दीन ओवेसी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत तोपर्यंत एमआयएम आघाडीतच असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष ओवेसी यांच्या घोषणेकडे लागून होते. अखेर ओवेसी यांनी आपला पक्ष वंचित आघाडीत सहभागी होणार.

- Advertisement -

नसल्याचे जाहीर करताना वंचित आघाडीवर टीकेची झोड उठविली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असे जलील यांनी जाहीर केले होते. तिच पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे ओवेसी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जलील हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार असून, त्यांच्याच निर्णय अंतिम राहील असे सांगत ओवेसी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -