घरताज्या घडामोडीमहाजन, मुंडेंनी युती टिकवली, स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कुणी टाकले? आशिष शेलारांचा...

महाजन, मुंडेंनी युती टिकवली, स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कुणी टाकले? आशिष शेलारांचा सवाल

Subscribe

प्रमोद महाजन, लालकृष्ण अडवाणी सर्वांनी कातडी वाचवली, बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी वार झेलले, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे महाजन यांनी युती टिकवली, पुढच्या पिढीने स्वार्थासाठी मीठ टाकले, ते नेते कोण आहेत ? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. मुस्लिमांचे लांघुचालन, याकुब मेननचे समर्थन करणारी ही शिवसेना आहे. शिवसेनेचा सत्तेसाठीची ही लाचारी अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. इतर मतदारसंघात पैसे वाटणाऱ्या आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या ताटाखालचा अंधार तपासावा, असेही ते म्हणाले. वांद्र्यातील आपल्या मतदारसंघातील कार्यक्रमाच्या निमित्ताने आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती आणि आता उद्धवजींची शिवसेना वेगळी आहे. बाळासाहेबांच्या काळात शिवसेना म्हणजे ज्वाजल्य हिंदुत्वाची सुवर्णफुलांसारखी वाटत होती, पण तीच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या निर्माल्य वाटलू लागली आहे. बाळासाहेबांसोबत असलेली भाजपची युती ही वैचारिक युती होती. पण आताची युती निर्माल्य झाली आहे. सध्याच्या शिवसेनेचा स्व स्वार्थ, स्वपद एवढाच विचार आहे. बाळासाहेबांच्या काळात महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण आणणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानच आहे, असेही ते म्हणाले. पण कलम ३६० आणि सीएएए, एनआरसी कायद्याला आताच्या शिवसेनेने विरोध विरोध का ? केला असाही प्रश्न त्यांनी विचारला.

- Advertisement -

९३ च्या दंगलीच्या बॉम्ब स्फोटातील याकूब मेननला फाशी नको म्हणणारे मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात आहेत. देशविरोधी कारवाया करणाऱ्या शर्जिल उस्मानी समर्थन करणारे मंत्री मंत्रीमंडळात का आहेत ? अशीही विचारणा आशिष शेलार यांनी केली. राम वर्गणीची टिंगल करणारे तसेच रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित हे शिवसेनेनेच केले आहेत.

सत्तेची लाचारी काय असते

मालाडमध्ये टिपू सुल्तान मैदानाचे भूमीपूजन हे मत्स विभागाचे मंत्री अस्लम शेख करणार आहेत. कदाचित शिवसेनेला मातीचा विसर पडला असेली अशी टीका आशिष शेलार यांनी केली. सत्तेची लाचारी काय असते ? त्यासाठी काय करावे लागते ? असेही ते म्हणाले. ज्या मंत्र्याने याकुब मेमनचे समर्थन केले, तोच मंत्री आता टिपू सुल्तान यांच्या नावे मैदानाचे भूमीपूजन करतो आहे. आता संजय राऊत यांची भूमिका काय असणार आहे ? आता का त्यांची बोबडी वळली आहे का असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

प्रमोद महाजन यांचे व्यंगचित्र हे जून आहे. आत्ताच ते मुद्दामून प्रसारित करण्याचा राऊतांचा नेमका हेतू काय ? टीका करायची, राग आला तर पळून जायचे हे कोणते कतृत्व आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला. तुमच्या विषयातल कार्टून काढले तर नेव्हीच्या अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो. आता तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका, असाही टोला राऊतांनी लगावला. महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची योग्यताही नाही, अशा शब्दात जहरी टीका केली आहे.

राऊतांना शेलारांचे आंदोलन

संजय राऊतांचा जन्म हा १९६१ ला झाला. शिवसेनेची स्थापना १९६६ रोजी झाली. तुम्ही स्वतःला कधीपासून इतिहासाचार्य समजू लागलात ? असाही सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांना खुल्या चर्चेला यावे असे आव्हान आशिष शेलार यांनी यावेळी दिले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -