घरमहाराष्ट्रAshok Chavan : अशोक चव्हाणांबरोबर 'हे' आमदारही राजीनाम्याच्या तयारीत?

Ashok Chavan : अशोक चव्हाणांबरोबर ‘हे’ आमदारही राजीनाम्याच्या तयारीत?

Subscribe

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने दिल्ली गाठून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने बुधवारी (13 फेब्रुवारी) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

मुंबई : राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्य आणि आमदारकीचा राजीनामा देऊन सोमवारी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप घडवून आणला. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्या पाठोपाठ मराठवाड्यात जनाधार असलेल्या अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्याने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या पक्षत्यागाने होणारी संभाव्य राजकीय हानी टाळण्यासाठी काँग्रेस अंतर्गत घडामोडीना वेग आला आहे. असे असतानाच काँग्रेसमधील आखणी काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. (Ashok Chavan Along with Ashok Chavan this MLA is also preparing to resign The pace of events in the Congress)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने दिल्ली गाठून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. चव्हाण यांच्या राजीनाम्याने राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने बुधवारी (13 फेब्रुवारी) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. अशोक चव्हाण येत्या दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांना राज्यात मंत्रिपद अथवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांच्या एका निकटवर्तीची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु आहे. या चौकशीमुळे अशोक चव्हाण हे गेले काही दिवस अस्वस्थ होते. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागणार असल्याची कुणकुण त्यांना होती. याशिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर चव्हाण हे नाराज होते. त्यामुळे चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत अर्धी चर्चा खरी ठरवली. चव्हाण यांनी आज सकाळी विधान भवनात येऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. नार्वेकर यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर चव्हाण यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसचे अनेक आमदार राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचा समावेश आहे.

हेही वाचा : Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी भाजपाचा प्लॅन तयार; असं आहे मतांचं गणित

- Advertisement -

‘या’ आमदारांच्या नावाची होतेय चर्चा

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीची उत्सुकता वाढली आहे. चव्हाण यांना राज्य मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे भाजपकडून चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील काही आमदार सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यात माधवराव पाटील जळगांवकर (हदगाव), मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण) जितेश अंतापूरकर (देगलूर), अमित झनक (रिसोड), माजी राज्यमंत्री दत्तात्रय सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, अमित देशमुख, धीरज देशमुख आदींच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय मुंबईतून अस्लम शेख, अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शेख यांनी आपण काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Ahsok Chavan : ‘आदर्श’ अशोक चव्हाणांची पाठ सोडेना; ‘हे’ आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या भाजप प्रवेशाचे खरे कारण!

माझ्याही नावाच्या वावड्या उठवल्या जातायेत

अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक का निर्णय घेतला हे माहित नाही. यासंदर्भात माझ्याशी त्यांची चर्चा झाली नाही. मी २००७ पासून त्यांच्या बरोबर काम केले आहे. चव्हाण गेले म्हणून विजय वडेट्टीवार जातील, अशा वावड्या उठत आहेत. पण त्यात तथ्य नाही, असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी धक्का आहे. भाजपची ताकद क्षीण झालेली आहे म्हणून भाजप असे काम करत असून त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांची गरज भासते आहे. कोणतीही आघाडी किंवा पक्ष एका व्यक्तीवर चालत नसतो. कोणाच्या आल्याने आणि गेल्याने पक्ष संपत नसतो अशी अनेक उदाहरणे आहेत. भाजप ही दोन वरून 300 वरती गेली आणि काँग्रेस इंदिरा गांधींच्या काळात नेस्तनाबूत होऊन पुन्हा उभी राहिली आहे, असे दानवे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -