घरमहाराष्ट्रJitendra Awhad : "तरूणांनो तयार राहा...", अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आव्हाडांची बोलकी प्रतिक्रिया

Jitendra Awhad : “तरूणांनो तयार राहा…”, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आव्हाडांची बोलकी प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या नेतेमंडळीकडून याबाबत मत व्यक्त करण्यात येत आहे. चव्हाणांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला याचा मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या काही दिवसांत मविआच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपात, शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केल्याने यामुळे मविआलाही खिंडार पडलेली आहे. परंतु, अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे मविआतील सर्वच नेते धक्क्यात आहेत. पण आता याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत तरुणांना राजकीय क्षेत्रात नवी संधी असल्याचे सांगितले आहे. (Jitendra Awhad’s eloquent reaction after Ashok Chavan’s resignation)

हेही वाचा… Ashok Chavan: दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार, पण…; चव्हाणांच्या मनात नेमके काय?

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांत ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमधून अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेले आहेत. याबाबत सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “पक्षाचा ‘मणका’ म्हणजे कार्यकर्ते असतात अन् त्यातल्या त्यात तरूण मुले आणि मुली असतात ! शेवटी रस्त्यावर येऊन लढण्याचे काम हे तरूण कार्यकर्तेच करीत असतात. किंबहुना जवळपास सर्वच आंदोलनात या तरूण कार्यकर्त्यांचाच अधिक सहभाग असतो. त्यामुळे विरोधी आघाडीतील सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे की, सर्व तरूण कार्यकर्त्यांना एक उत्तम संधी लाभली आहे.” त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी राजकारणात येण्याची इच्छा असलेल्या तरूण-तरूणींना राजकारणात येण्याचे एक प्रकारे आवाहनच केल्याचे बोलले जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले की, “आणीबाणीनंतर सन 1977 मध्ये इंदिरा गांधी विरूद्ध सर्व, अशी एक लढाई झाली होती. या लढाईत इंदिरा गांधी यांचा दारूण पराभव झाला. हळुहळू सगळ्यांनीच त्यांची साथ सोडायला सुरुवात केली. पण, संजय गांधी यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी रिकाम्या जागा भरण्यासाठी एक नवीन फळी निर्माण केली. त्याचा परिपाक म्हणजे, 1980 साली 300 च्या वर जागा जिंकून इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. नेते सोडून गेल्याने पक्ष रसातळाला गेला, असे कधीच होत नाही. पक्षाचा ‘मणका’ म्हणजे कार्यकर्ते असतात अन् त्यातल्या त्यात तरूण मुले आणि मुली असतात ! शेवटी रस्त्यावर येऊन लढण्याचे काम हे तरूण कार्यकर्तेच करीत असतात. किंबहुना जवळपास सर्वच आंदोलनात या तरूण कार्यकर्त्यांचाच अधिक सहभाग असतो. त्यामुळे विरोधी आघाडीतील सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे की, सर्व तरूण कार्यकर्त्यांना एक उत्तम संधी लाभली आहे. हे राज्य, या राज्याचे बिघडलेले राजकारण, बिघडलेली सामाजिक अवस्था, सुसंस्कृत राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आणि लोकशाहीची होत असलेली गळचेपी यातून मार्ग काढण्याची ताकद आणि हिमंत त्यांच्यातच आहे. तरूणांनो, तयार राहा पुढचा महाराष्ट्र आणि पुढचा भारत तुमच्या हातातच असेल!”

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी आज (ता. 12 फेब्रुवारी) सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. पण आता अशोक चव्हाण यांच्या नावाचे लेटरहेड समोर आल्याने या बातमीवर शिक्कामोर्तब झाला. परंतु, यामुळे काँग्रेसला मोठा खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे आता काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. तर पुढील दोन दिवसांत अशोक चव्हा हे त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -