घरमहाराष्ट्रमराठा समाजाच्या तीव्र रोषामुळे केंद्र सरकार झुकले, भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक

मराठा समाजाच्या तीव्र रोषामुळे केंद्र सरकार झुकले, भाजप नेत्यांकडून महाराष्ट्राची फसवणूक

Subscribe

सत्ताकारणासाठी संवैधानिक पदांची प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य नाही.

मराठा आरक्षणावरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरुन केलेलं वक्तव्य चुकीचे आणि फसवे असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले होते. यावर १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे राज्यांच्या अधिकारांवर बाधा येते, अशी भूमिका अॅटर्नी जनरल यांनी ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती व त्याचीच संक्षिप्त माहिती मी विधीमंडळात दिली होती. अॅटर्नी जनरल नेमके काय म्हणाले, ते नमूद केले आहे. परंतु, मराठाआरक्षण प्रकरणातील अॅटर्नी जनरल यांची विधाने माझ्या तोंडी घालून भाजप नेते महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. किमान संवैधानिक पदावर बसलेल्या भाजप नेत्यांनी तरी असले उद्योग करू नयेत, अशी अपेक्षा आहे. सत्ताकारणासाठी संवैधानिक पदांची प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य नाही. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निर्णय शेअर केला आहे. मराठा समाजातून तीव्र रोष व्यक्त झाल्याने अखेर केंद्र सरकार झुकले व त्यांनी आपली भूमिका बदलली. १०२ व्या घटनादुरूस्तीमुळे राज्यांचे अधिकार बाधीत होत नाही, अशी सुधारित भूमिका काल त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. या नवीन भूमिकेचे मी राज्य सरकारकडून स्वागत करतो. असे ट्विट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मराठा आरक्षणप्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीनंर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नाही असे म्हटले असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन मंत्री अशोक चव्हाण यांचे वक्तव्य फसवे आणि मराठा समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले होते. तसेच अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकार आणि विशेषतः मराठा आरक्षणाचा विषय हाताळणारे मंत्री अशोक चव्हाण हे निखालस दिशाभूल करणारी माहिती मराठा समाजापुढे मांडत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सांगून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मराठाआरक्षण प्रकरणातील अॅटर्नी जनरल यांची विधाने माझ्या तोंडी घालून भाजप नेते महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -