घरताज्या घडामोडीAshok Chavan : मी सोनिया गांधींना भेटलो नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर अशोक...

Ashok Chavan : मी सोनिया गांधींना भेटलो नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्क मैदानात इंडिया आघाडीच्या सभेने झाला. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर देशातील इंडिया आघाडीने या सभेतील प्रचाराचा नारळ फोडला. याच सभेत भाष्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमधून राज्यसभेत गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधाल.

तुरुंगाच्या भीतीने सोनिया गांधींसमोर रडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला. मात्र, गांधींच्या या आरोपावर अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले असून सर्व आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवाजी पार्क मैदानात इंडिया आघाडीच्या सभेने झाला. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर देशातील इंडिया आघाडीने या सभेतील प्रचाराचा नारळ फोडला. याच सभेत भाष्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमधून राज्यसभेत गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधाल. (ashok chawan answer to congress leader rahul gandhi on india alliance)

भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी आज (18 मार्च) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधी यांच्या आरोपांवर चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. “राहुल गांधींचं वक्तव्य हास्यास्पद असून मी सोनिया गांधींना भेटलो नाही”, असे प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?

“राज्यातील एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला. तो माझ्या आईला रडून सांगत होता की, सोनियाजी मला लाज वाटते. माझ्यात या शक्तीच्या विरोधात लढण्याची हिंमत नाही. मी तुरुंगात जाऊ शकत नाही. दबावामुळे भाजपमध्ये गेलेले ते एकटेच नेते नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेते असेच भाजपमध्ये गेले नाहीत. मी ज्या शक्तीचा उल्लेख करत आहे, त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना सोबत घेतले आहे. त्यामुळे हे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत”, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या टीका केली.


हेही वाचा – Lok Sabha 2024 :कोल्हापूर काँग्रेसला तर सांगली ठाकरे गटाकडे; मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -