घरदेश-विदेशPM Modi : शक्तीच्या रक्षणासाठी मी जीवाची बाजी लावायला तयार; पंतप्रधान मोदींचा...

PM Modi : शक्तीच्या रक्षणासाठी मी जीवाची बाजी लावायला तयार; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

Subscribe

इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही मोदींच्या विरोधात नाही, भाजपच्या विरोधा नाही तर त्यांच्या मागे असलेल्या शक्तीच्या विरोधात लढत असल्याचे म्हटले. राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोविस तासांच्या आत पलटवार केला आहे.

मुंबई – इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही मोदींच्या विरोधात नाही, भाजपच्या विरोधा नाही तर त्यांच्या मागे असलेल्या शक्तीच्या विरोधात लढत असल्याचे म्हटले. राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोविस तासांच्या आत पलटवार केला आहे. तर काँग्रेस नेते आता राहुल गांधींना काय म्हणायचे होते, याचे स्पष्टीकरण देत आहेत. (pm narendra modi slams congress leader rahul gandhi india alliance)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 मार्च) तेलंगणातील जगतयालमध्ये प्रचारसभेला संबोधित करत होते. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणानंतर इंडिया आघाडीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. शिवाजी महाराज हे शत्रूच्याही महिलांचा सन्मान करत होते. अशा परस्त्री मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा झाली. यामध्ये त्यांनी त्यांचे घोषणापत्र जाहीर केले. इंडिया आघाडीने जाहीर केले की आमची लढाई एका शक्तीच्या विरोधात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्यासाठी प्रत्येक आई, मुलगी ही शक्तीचे रुप आहे. मी भारतमातेचा पुजारी आहे. इंडिया आघाडीने शक्तीला संपवण्याचे आव्हान दिले आहे, त्यांचे आव्हान मी स्वीकारतो. मी माता, भगिनींना शक्तीस्वरुप मानतो. या माता, भगिनी आणि मुलींच्या रक्षणासाठी मी जीवाची बाजी लावायला तयार आहे.

नरेंद्र मोदी सभेला उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाले, भारतीय धरतीवर कोणी शक्तीच्या विनाशाची भाषा करु शकतो का? शक्तीचा विनाश आम्हाला मान्य आहे का? तुम्ही सर्व शक्तीची अराधना करता की नाही? संपूर्ण देश शक्तीची पूजा करतो की नाही? असे सवाल उपस्थित जनसमुदायाला उद्देशून केले. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही चंद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर चंद्रयान लँड झाले त्या ठिकाणाला शिवशक्तीचे नाव दिले.

- Advertisement -

हेही वाचा – PAWAR VS PAWAR : सख्खा भाऊच अजितदादांच्या विरोधात; श्रीनिवास म्हणाले, तुमच्यासारखा नालायक कोणी नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -