घरमहाराष्ट्रमशिदीवरील भोंगे काढायला आरपीआयचा विरोध : रामदास आठवले

मशिदीवरील भोंगे काढायला आरपीआयचा विरोध : रामदास आठवले

Subscribe

येत्या ३ तारखेपर्यंत राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलं. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि मंत्र्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरूवात केली. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही विरोध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात ‘मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू’ असं वक्तव्य केलं. त्यानंतर याचपार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभेत’ राज ठाकरे यांनी आम्ही मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं म्हणत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या ३ तारखेपर्यंत राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलं. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि मंत्र्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरूवात केली. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही विरोध केला आहे.

राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भुमिकेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. ‘देशातील मुस्लिम हे देशातीलच आहेत. हे लोक पुर्वी हिंदू होते त्यापूर्वी ते बौध्द होते. मात्र मोगल देशात आले तेव्हा लोक मुस्लिम झाले, असे म्हटले आहे. तर शंकराचार्य यांनी देशात हिंदू धर्म आणला आणि देशात हिंदू वाढले. त्याचवेळी देशात इंग्रज आले आणि अनेक लोक ख्रिश्चन झाले’ असं त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

‘राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोगे काढण्याच्या भुमिकेला आमचा विरोध आहे. मंदिरावर भोंगे लावा त्याला आमचा विरोध नाही पण मशिदीवर भोंगे काढायला आरपीआयचा विरोध आहे. देशात पेशवाई नसून लोकशाही असल्यानं आपली राज ठाकरेंना विनंती असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. ‘बाळासाहेबांनीदेखील कधीही भोंगे काढा असं म्हटलं नाही. मात्र राज ठाकरे मुस्लिमांच्या मागे का लागले आहेत?’, असा सवाल त्यांनी केला.

‘मनसेच्या पहिल्या झेंड्यात पाच रंग होते. त्यात हिरवा आणि निळा रंग होता याची आठवण ही आठवले यांनी करवून दिली. मनसेच्या पहिल्या झेंड्यात हिरवा आणि निळा रंग होता हे जरी खरे असले तरिही त्यांच्या मागे लोक गेले नाही. त्यामुळं आता त्यांनी भगवा रंग घेतला आहे. राज ठाकरे काहिही बोलले तरी मशिदीवरील भोंगे काढू नये’ असं आवाहन ही यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला केले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार जातीवादी नाहीत. पवार दलित आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याचे म्हटले. पवार हे शिवाजी महाराजांना माननारे नेते आहेत. फक्त वैचारिक भूमिका म्हणून ते फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेतात’, असं आठवले यांनी म्हटलं. तसंच, राज ठाकरे म्हणतात म्हणून पवारांनी शिवाजी महाराजांचे नाव घ्यावेच का असा सवाल ही त्यांनी केला. पवार हे सगळ्या जातीधर्माचे असल्यानेच त्यांनी मराठावाडा विद्यापीठ नामांतरासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. त्यामुळे पवारांना जातीवादी म्हणणे चुकीचे आहे.


हेही वाचा – खासदार नवनीत राणांना वाय प्लस सुरक्षा प्रदान, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -