घरमहाराष्ट्रपुणेAwhad On Ajit Pawar : आव्हाडांचा अजित पवारांवर थेट हल्ला; म्हणाले- 'धमक्या...

Awhad On Ajit Pawar : आव्हाडांचा अजित पवारांवर थेट हल्ला; म्हणाले- ‘धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा’

Subscribe

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गट कधी जाहीर सभांमधून तर कधी मीडियासमोर येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सध्या सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला असतानाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडायला सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेंकावर चिखलफेक करताना दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिल्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाडांकडून दादांवर थेट हल्ला करण्यात आला आहे. धमक्या देणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. (Awhad On Ajit Pawar Awhad direct attack on Ajit Pawar He said The nature of making threats is from before)

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गट कधी जाहीर सभांमधून तर कधी मीडियासमोर येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशातच पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान देत आगामी निवडणुकीत कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पाडतोच अशी धमकीच देऊन टाकली होती. यानंतर कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांना उत्तर दिलं खरं. मात्र, आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांच्या त्या इशाऱ्याचा खरपूस समाचार घेतला असून, त्यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ram Mandir Ayodhya : ‘उद्धव ठाकरे खरंच हिंदूत्ववादी असतील तर…’, सुबोध मोहितेंची टीका

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

सोमवारी (1 जानेवारी) रोजी पुणे दौऱ्यावर असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांना दिलेल्या खुल्या आव्हानाचा जोरदार समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणाले की, अजित पवार यांचा धमक्या देण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे. ते उघड धमक्या देतात हे जनतेला दिसून येत आहे. त्यांनी आजपर्यंत तेच केलं आणि शरद पवारांची जवळची चांगली- चांगली माणसं त्यांनी तोडून टाकली. ही त्यांची दादागिरी आहे. वर्षानुवर्षे त्यांनी पक्षात दादागिरीच केली अशा शब्दांत आव्हाडांनी अजितदादांवर थेट हल्ला केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोणताही प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही, CM Eknath Shinde यांचा पुनरुच्चार

शरद पवारांना दुःख होत नाही असं वाटतं तुम्हाला

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या बंडाचा शरद पवार यांना दुःख झालं नसेल का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दिल्लीला शरद पवार जेव्हा एकटे बसत असतील तेव्हा ते विचार करत असतील की, मी कुठे कमी पडलो, अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना काय द्यायचे शिल्लक होते. पाण्यात पोहणारा मासा आपल्याला रडताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही, ते बोलून दाखवत नाहीत, म्हणजे त्यांना दुःख होत नाही, असे वाटतं का तुम्हाला?” अशा शब्दांत आव्हाड यांनी खंत व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -